Kolhapur News : प्रशांत कोरटकरला अटक, सोशल मीडियावर व्हायरल पोस्टची कोल्हापुरात चर्चा

Prashant Koratkar : सोशल मीडियावर व्हायरल पोस्टमध्ये कोरटकरला न्यायालयात हजर करण्यापूर्वी पायतान घेऊन एकत्र येण्याचं आव्हान करण्यात आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पुजारी, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करुन फरार झालेल्या प्रशांत कोरटकरला पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत. महिनाभर गुंगारा देणाऱ्या कोरटकरला तेलंगणातून पोलिसांना अटक केली आहे. आज कोरटकरला कोल्हापूर कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याआधी कोल्हापुरात एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सोशल मीडियावर व्हायरल पोस्टमध्ये कोरटकरला न्यायालयात हजर करण्यापूर्वी पायतान घेऊन एकत्र येण्याचं आव्हान करण्यात आलं आहे. कोल्हापुरातल्या मावळ्यांनो पायतान घेऊन कोरटकरच्या स्वागताला या, अशी ही पोस्ट आहे. 

काय लिहिलंय पोस्टमध्ये?

"नागपूरच्या नालायकला पोलीस कोल्हापुरात घेऊन आले आहेत. मावळ्यांनु येताय ना पायताण घेऊन स्वागतला. मी येणार तुम्ही पण या कोल्हापूर कोर्ट सकाळी 11 वाजता"

Kolhapur Post

(नक्की वाचा- Shivsena Rada: शिंदेंच्या उपशहर प्रमुखाला महिलेने कानफटवले, शिंदेंच्या सेनेत चाललंय काय?)

दोन दिवसांपूर्वीच प्रशांत कोरटकर याने अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर आता कोरटकरला तेलंगणामधून अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. 

Advertisement

Kunal Kamra : एकनाथ शिंदेंवरच नाही तर पंतप्रधान मोदींवरही गाणं; कुणाल कामराची 'ही' सहा गाणी व्हायरल

काय आहे प्रकरण?

प्रशांत कोरटकर याने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकी दिली होती. तसेच त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला होता. त्याचे हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर 25 फेब्रुवारीपासून प्रशांत कोरटकर हा फरार होता.