सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापुर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. मध्यरात्री साधारण तीनच्या सुमारास एमआयडीसीतील एका कंपनीला आग लागली. या आगीत तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील एमआयडीसीतील सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री तीनच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अद्यापही 5-6 जण कारखान्यात अडकल्याची माहिती आहे. तरी घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पोहोचली आहे. तर पोलिसांचा ही मोठा बंदोबस्त तैनात आहे.
बातमी अपडेट होत आहे.