Solapur Crime: गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण, हत्येचा प्रयत्न, राजकीय वर्तुळात खळबळ

मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करुन हत्येचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सौरभ वाघमारे, सोलापूर: सोलापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापुरात भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करुन हत्येचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

India Alliance News: इंडियाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा अपमान? सहाव्या रांगेत स्थान दिल्याने चर्चांना उधाण

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शरणु हांडे असे अपहरण झालेल्या गोपीचंद पडळकर समर्थकाचे नाव आहे. तर अमित सुरवसे असे अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी हे अपहरण करण्यात आले असून यावेळी हत्येचा प्रयत्न झाल्याचेही सांगण्यात येत आहे. 

आरोपी अमित सुरवसे याने 2021 मध्ये गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला केला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी शरणू हांडे याने अमित याला काही महिन्यांपूर्वी मारहाण केली होती. या मारहाणीचा बदला घेण्यासाठी हे अपहरण करण्याच आल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली करण्यात आली आहे.

स्वप्नातलं घर की मृत्यूचा सापळा! बिल्डरकडून फसवणूक, 70 कुटुंबांवर मंदिरात राहण्याची वेळ

 या धक्कादायक प्रकरणात पोलिसानी आरोपी अमित सुरवसेसह अन्य 6 आरोपीवर हत्येच्या उद्देशाने अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. सोलापुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

Topics mentioned in this article