Solapur Lawyer Suicide: वकीलाच्या आत्महत्येने खळबळ, सुसाईड नोटमध्ये आईवर गंभीर आरोप

Solapur Crime News: सागर श्रीकांत मंद्रूपकर असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे. सागर मंद्रूपकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

सौरभ वाघमारे, सोलापूर

Solapur News: वकिलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूरच्या विजापूर परिसरातून समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी वकिलाने चिट्टी देखील लिहून ठेवली आहे.  यात आईकडून होणाऱ्या सततच्या दुजाभावाच्या वागणुकीमुळे वकीलाने आपण जीवन संपवत असल्याचं सांगितलं आहे.

सागर श्रीकांत मंद्रूपकर असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे. सागर मंद्रूपकर याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.

(नक्की वाचा- Indurikar Maharaj: इंदोरीकर महाराज कीर्तन सोडणार? मुलीच्या कपड्यांवर ट्रोलिंगमुळे मोठ्या निर्णयाचे संकेत)

सागर मानसिक तणावात असल्याचे चिठ्ठीतून समोर येत आहे. त्याने आपल्या संदर्भात चिठ्ठीत लिहिलं की, 'आईकडून होणारा सततचा दुजाभाव यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला ती जबाबदार असून माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा करा, ही नम्र विनंती.' दोन पानांच्या चिठ्ठीत वकीलाने अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. 

(नक्की वाचा-  VIDEO: "तुम्हाला लाज वाटली पाहिजे...", पापाराझींोना पाहून सनी देओलचा पारा चढला)

सागर आणि त्याच्या आईचे मंगळवारी रात्री भांडण झाले होते. यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. सागर याचे वडील सरकारी नोकरदार आहेत. सोलापुरातील सिव्हिल पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.विजापूर नाका पोलीस पुढील तपास करत आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article