Solapur News: सोलापुरात दूषित पाण्यामुळे 2 मुलींचा मृत्यू, कुटुंबियांचा आक्रोश; नागरिकांचा संताप

Solapur Water News: भाग्यश्री म्हेत्रे हिच्यावर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाग्यश्री म्हात्रे आणि जिया म्हात्रे या दोघी सख्ख्या बहिणी आहेत.. यातील भाग्यश्री म्हात्रेवर उपचार सुरू आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

सौरभ वाघमारे, सोलापूर: सोलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत राहणाऱ्या दोन शाळकरी मुलींचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा शाळकरी मुलींच्या जीवावर बेतला असून दोन मुली दगावल्या तर एक मुलगी उपचार घेत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांसह, स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सोलापुरात दूषित पाण्यामुळे नववी आणि दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ममता म्हेत्रे आणि जिया म्हात्रे असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलींची नावे आहेत. भाग्यश्री म्हेत्रे हिच्यावर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाग्यश्री म्हात्रे आणि जिया म्हात्रे या दोघी सख्ख्या बहिणी आहेत.. यातील भाग्यश्री म्हात्रेवर उपचार सुरू आहेत.

बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत कष्टकरी कामगार आणि करून करून खाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दूषित पाण्यामुळे उलटी आणि जुलाब याचा त्रास होत असल्याचाही आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.  सोलापुरातील अनेक भागात अशाच पद्धतीने दूषित पाण्याचा पुरवठा केला जातो. सोलापूर महानगरपालिका दूषित पाणीपुरवठा याबाबत निवेदन देऊनही स्थानिक नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

Raj Thackeray Letter : मुख्यमंत्र्यांचा इशारा, मनसेची माघार; राज ठाकरेंचे आंदोलक कार्यकर्त्यांना आदेश

आता महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा शाळकरी मुलींच्या जीवावर बेतला आहे. मुलींचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिक नागरिक आक्रमक झाले होते.. ममता म्हेत्रे तिची अंत्ययात्रा काढताना स्थानिक नागरिकांनी ठिय्या आंदोलन करत महानगरपालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.. पोलीस प्रशासनाने समजूत काढल्यानंतर ममता म्हेत्रे हिची अंत्ययात्रा काढण्यात आली.. महानगरपालिकेतील दोष अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Advertisement

दरम्यान, झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दूषित पाण्यामुळे उलटी आणि जुलाब याचा त्रास होत असल्याचाही आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. भाजप आमदार देवेंद्र कोठे, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी सदर मयत शाळकरी मुलींच्या कुटुंबांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याची आदेश दिले आहेत.