जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! सोलापूरमधील 17 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई; कारण काय?

 ग्रामपंचायत निवडणूक संपल्यानंतरही वेळेत खर्च न देणे तसेच अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तडकाफडकी निर्णय देत 17 ग्रामपंचायतींना मोठा धक्का दिला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सौरभ वाघमारे, सोलापूर: सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील तीन सरपंचासह 14 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणूक संपल्यानंतरही वेळेत खर्च न देणे तसेच अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तडकाफडकी निर्णय देत 17 ग्रामपंचायतींना मोठा धक्का दिला आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील तीन सरपंचासह 17 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणूक संपल्यानंतरही वेळेत खर्च न देणे आणि शासकीय जागेत अतिक्रमण केल्याचा ठपका या सदस्यांवर करण्यात आला आहे.

याबाबत 2021- 22 साली जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींच्या तक्रारी  जिल्हा प्रशासनाकडे दाखल करण्यात आल्या होत्या. याबाबत सुनावणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा निकाल दिला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 दक्षिण सोलापूर, बार्शी, करमाळा, माढा, सांगोला या तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा अपात्र केलेल्यांमध्ये समावेश आहे. तर  सांगोला, अक्कलकोट, माळशिरस तालुक्यातील तीन आपत्य असणाऱ्या तीन सदस्यांचे सदस्यत्व पद अपात्र करण्यात आले आहे. यांपैकी माढा तालुक्यातील सात सदस्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

तसेच तीन अपत्य असल्याने सांगोला तालुक्यातील बामणी ग्रामपंचायतीचे सदस्य अर्जुन साळुंखे, अक्कलकोट तालुक्यातील मुंढेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य सुरेखा दिलीप माळी आणि माळशिरस तालुक्यातील बचेरी ग्रामपंचायतीचे सदस्य शालन माने यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाने सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

Advertisement

(नक्की वाचा- दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसचे 21 उमेदवार ठरले; केजरीवाल यांच्याविरोधात तगडा उमेदवार मैदानात)