Solapur News: पत्नी नांदायला येत नसल्याने निराश झालेल्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरमध्ये घडली आहे. प्रेम अंकुश जाधव असं या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी पतीला ऑडिओ तसेच व्हिडिओ संदेश पाठवला अन् त्याने मृत्यूला कवटाळले. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बायको नांदायला येत नसल्याने आत्महत्या
याबाबत सविस्तर वृत्त असं की, सोलापुरात पत्नीला नांदवण्यास न पाठवल्याने निराश झालेल्या पतीची व्हिडिओ करून आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. मध्यरात्री बाराच्या सुमारास घराच्या वर्षाला साडीच्या साह्याने तरुणाने आयुष्य संपवले. अचानक आवाज आल्याने दुसऱ्या खोलीतील भावाने पळत येऊन वाचवण्याचा प्रयत्नही त्यानंतर त्याला सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.
-तळे हिप्परगा येथील प्रेम अंकुश जाधव याचा एका वर्षापूर्वी प्रेम विवाह झाला होता. दोन महिन्यांपूर्वी त्याला एक मुलगीही झाली. मुलीच्या डिलिव्हरीसाठी त्याची पत्नी माहेरी गेली होती. मात्र ती पुन्हा सासरी येण्यास नकार देत होती. मात्र दोन महिने होऊन गेले तरी पत्नी नांदवण्यास येत नसल्यामुळे प्रेम तणावात होता.
मुलीला सांभाळ, वाईट वळणं..
तो तिला होळीच्या सणाला बोलावत होता, मात्र ती नकार देत होती. यामुळेच निराश झालेल्या प्रेमने टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येआधी त्याने व्हिडीओ केला. त्यामध्ये तो मुलगीला फ्लाईंग किस देताना दिसत आहे. सोबतच त्याने पत्नीला एक ऑडिओ संदेशही पाठवला होता. या संदेशामध्ये तो म्हणतो मी किती दिवस फोन करतोय, तू माझ्या लेकराचे तोंड दाखवत नाहीस. माझ्या शब्दाला मान न देता तू तुझ्या आईचंच ऐकत आहेस. माझ्याकडे काही चुकलं असेल तर माफी मागतो. माझ्या लेकराला चांगलं सांभाळ, चांगलं वळण लाव, असं सांगत आहे.
तसेच तुला दुसरं लग्न करायचं असेल तर कर मला काही फरक पडत नाही. माझ्या मुलीला नीट सांभाळ, तिला कोणते वाईट वळण लावू नको एवढी काळजी घे. आजपर्यंत तु जेवढ्या चुका केल्या त्या सगळ्या माफ केल्या. माझ्या मयतीलाही येऊ नका, असं म्हणत आहे. दरम्यान, प्रेमविवाह अन् वर्षभरातच त्याचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
(नक्की वाचा- Bhandara News: घरात आईचे पार्थिव, डोळ्यांत अश्रू... पण मुलाने स्वत:ला सावरत दिला बोर्डाचा पेपर)