Solapur News : माढ्यात शरद पवारांच्या आमदाराचा फडणवीस पॅटर्न; भाजपाच्या प्रकल्पाचा भरसभेत प्रचार

ZP Election 2026 : जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत जिथे भाजपला घेरण्याची रणनीती आखली जात आहे, तिथेच पवारांच्या आमदाराने या प्रकल्पाचे मार्केटिंग केल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
ZP Election 2026 : पस्थितांना हा राष्ट्रवादीचा प्रचार सुरू आहे की भाजपचा, असा प्रश्न पडला.
माढा, सोलापूर:

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी

ZP Election 2026 : विरोधी पक्षाच्या प्रचार सभेत सत्ताधाऱ्यांच्या कामाचे गोडवे गायले गेले की राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येणारच. सोलापूर जिल्ह्यात सध्या असाच काहीसा प्रकार घडताना दिसत आहे. शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांनी चक्क राष्ट्रवादीच्या मंचावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचे कौतुक केले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत जिथे भाजपला घेरण्याची रणनीती आखली जात आहे, तिथेच पवारांच्या आमदाराने या प्रकल्पाचे मार्केटिंग केल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे. 

राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर भाजपाचा छुपा प्रचार

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ नुकताच पंढरपूर आणि माढा परिसरात फोडण्यात आला. या सभेत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासारखे दिग्गज नेते उपस्थित होते. या सभेचा मुख्य उद्देश भाजपविरोधी वातावरण तयार करणे हा होता. 

मात्र, आमदार अभिजीत पाटील यांनी आपल्या भाषणात शक्तीपीठ महामार्गाचे असे काही फायदे सांगितले की, उपस्थितांना हा राष्ट्रवादीचा प्रचार सुरू आहे की भाजपचा, असा प्रश्न पडला. या महामार्गामुळे माढा मतदारसंघात प्रचंड विकास होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

Advertisement

(नक्की वाचा : Raj Thackeray: ठाकरेंचं 'ठरलं'? राज-उद्धव यांच्यातील जवळीक वाढली; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार? )

9 हजार कोटींचा निधी आणि पालकमंत्र्यांची मध्यस्थी

आमदार अभिजीत पाटील यांनी भाषणादरम्यान सांगितले की, शक्तीपीठ महामार्गामुळे माढा मतदारसंघासाठी 9000 कोटी रुपयांचा मोठा निधी उपलब्ध होणार आहे. त्यांनी पुढे असाही खुलासा केला की, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना या महामार्गाच्या रचनेबाबत काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. 

त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी या महामार्गाचा मार्ग बदलून तो तुळजापूरहून निरानरसिंगपूर आणि शिखर शिंगणापूर मार्गे कोल्हापूरच्या ज्योतिबापर्यंत नेण्यास संमती दिली. माढा मतदारसंघातून हा मार्ग 90 किलोमीटर जाणार असून त्यातून विकासाची गंगा वाहणार असल्याचे पाटील यांनी आवर्जून सांगितले.

Advertisement

( नक्की वाचा  : Sahar Sheikh : मुंब्र्यातील AIMIM नगरसेविका सहर शेख यांनी मागितली माफी! पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं? )

विरोधकांच्या गोटात फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टची चर्चा

शक्तिपीठ महामार्ग हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो. कोल्हापूरसह राज्यातील अनेक भागांत या प्रकल्पाला शेतकऱ्यांनी आणि काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी जोरदार विरोध केला आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेते या प्रकल्पावरून सरकारला लक्ष्य करत असताना, पवारांच्याच आमदाराने या प्रकल्पाचे उघडपणे समर्थन करणे ही विशेष बाब मानली जात आहे. यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपच्या विकासकामांचीच जाहिरात होत असल्याची चर्चा आता सोलापूरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
 

Topics mentioned in this article