संकेत कुलकर्णी, सोलापूर:
Solapur Sharad Koli News: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांची पाच एकर जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवेढा येथील शेतकरी मच्छिंद्र साखरे यांनी आपली महार वतनातील जमीन शरद कोळी यांनी धमकावत बळकावली असल्याचा गंभीर आरोप केला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Vasai-Virar News: वसई-विरारचा कायापालट होणार! नव्या आयुक्तांकडून 'ॲक्शन प्लॅन' जाहीर
ठाकरेंच्या फायरब्रँड नेत्याने जमीन बळकावली?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे शरद कोळी आता एका गंभीर वादात अडकले आहेत. मंगळवेढा तालुक्यातील एका शेतकऱ्याची पाच एकर जमीन बेकायदेशीरपणे बळकावल्याचा खळबळजनक आरोप कोळी यांच्यावर करण्यात आला आहे. मच्छिंद्र साखरे या पीडित शेतकऱ्याने थेट समोर येत शरद कोळी यांनी सत्तेचा आणि त्यांना मिळालेल्या पोलीस संरक्षणाचा गैरवापर करून आपली हक्काची जमीन बळकावल्याचे म्हटले आहे.
ही जमीन 'महार वतन' प्रवर्गातील आहे. साखरे यांचा आरोप आहे की, कोळी यांनी केवळ जमिनीवर कब्जा केला नाही, तर सरकारी नियमांना धाब्यावर बसवून ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, ज्या पोलिसांना कोळींच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे, त्यांनाच पुढे करून कोळी सर्वसामान्यांना धमकावत असल्याचे साखरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
(नक्की वाचा- Nagpur School Holiday: नागपुरात शनिवारी सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर; कुणा-कुणाला सुट्टी लागू?)
प्रशासनावर नाराजी...
तक्रारदार शेतकऱ्याने प्रशासनावरही नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार तक्रार करूनही पोलीस किंवा महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. "माझी जमीन मला परत मिळावी आणि शरद कोळी यांचा पोलीस बंदोबस्त तातडीने काढून घ्यावा," अशी आर्त साद साखरे यांनी सरकारला घातली आहे. आता यावर ठाकरे गट किंवा स्वतः शरद कोळी काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.