Solapur News : ना सायकल, ना स्कूल बस; वस्तीतील आदर्शचा घोड्यावरुन शाळेपर्यंत प्रवास, गावात चर्चा

सध्या आदर्श साळुंखे वैराग येथील साधना शाळेमध्ये इयत्ता नववीचे शिक्षण घेत असून रोज सातत्याने शाळेत येतो.

जाहिरात
Read Time: 2 mins

सौरभ वाघमारे, प्रतिनिधी

Solapur News : आज-काल मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागते. कधी पायी, कधी दुचाकीवर, कधी रिक्षा,कधी स्कूल बसमध्ये तर कधी स्वतःच्या गाडीने शाळेत सोडायला जावे लागते. मात्र वैरागमधील आदेश साळुंखे हा आपल्या शाळेत ना चालत,नना वाहनाने तर सरळ  घोड्यावरती येतो. त्याची ही घोड्यावरची स्वारी सर्वत्र चर्चेत असून आकर्षणही ठरू लागली आहे.

आजकाल शाळा म्हटले की, सोयी सुविधा आल्याच. मग मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पायी, सायकल, स्कूलबस, रिक्षा स्वतःची चार चाकी असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र जे वाडी वस्तीवर राहतात, त्यांना एक तर वाहन किंवा चालत येण्याशिवाय पर्याय नसतो. अशापैकीच एक असलेला सोलापुरातील आदर्श साळुंखे हा विद्यार्थी वैरागपासून जवळ असलेल्या सावंत वस्तीमध्ये राहतो. त्याच्या आजोबांकडे दीडशे शेळ्या आणि सात घोडी देखील आहेत. त्यामुळे जर शाळेत येण्यासाठी आदर्शला कोणतंच वाहन मिळालं नाही तर चक्क तो घोडा घेऊन शाळेत येतो.

Advertisement

नक्की वाचा - Ashadhi Wari : आषाढी वारीच्या 8 दिवसात एसटीचं 36 कोटींचं उत्पन्न; 9 लाखांहून अधिक भाविकांना घडवलं विठ्ठल दर्शन 

Advertisement

सध्या आदर्श साळुंखे वैराग येथील साधना शाळेमध्ये इयत्ता नववीचे शिक्षण घेत असून रोज सातत्याने शाळेत येतो. यापूर्वी मुंबई- औरंगाबाद असा प्रवास केलेला असल्याने आदर्शला कोणत्याही परिस्थितीचा सामना करायची सवय लागली आहे. त्यामुळे शाळेला जाण्यास वाहन मिळाले तर ठीक नसेल तर आजोबा सांभाळत असलेल्या घोड्यांपैकी एक घोडा घेतो आणि सरळ शाळा गाठतो.घोडा. हा मुळातच रुबाबदार प्राणी आणि त्याच्यावर बसणारा देखील रुबाबदार ठरतो. 

Advertisement

घोड्यावर बसण्याची अनेकांना आवड आणि हौस असते. मात्र हीच हौस दुसऱ्याची गरजही असते. ह्याचे चित्र वैरागमध्ये आदेश साळुंखे यांच्याकडे बघितल्यानंतर कळते. या घोड्यावर तो शाळेत आल्यानंतर सवंगड्यांसाठी औत्सुक्याचा विषय तर असतोच पण रस्त्यावरून येता जाता पाहणाऱ्यांना आश्चर्य वाटते. इयत्ता नववी मध्ये शिकणारा आदर्श केवळ घोड्यावरच शाळेत येतो असे नाही. तर आल्यानंतर त्याला शाळेशेजारी असलेल्या चिंचेच्या झाडाखाली सावलीत बांधणे. त्याच्यासाठी चारा, त्याला पाणी पाजणे.आधी सेवा देखील तो करतो.

हे सर्व कार्य तो शाळेच्या मधल्या सुट्टीत करतो हे विशेष आहे. वस्तीवर राहण्यास असल्यामुळे त्याला शाळेत येण्यासाठी घोडा महत्त्वाची भूमिका बजावतो. वाहनांची वाट न बघता घोडा घेऊन का येईना पण तो शाळेत येऊन रोज हजेरी लावत असल्यामुळे त्याची शिक्षणाबद्दल असलेली आवड यातून लक्षात येते. लांबच्या वस्तीवरून येणाऱ्या आदर्शच्या घोड्याबद्दल शाळेला कोणतीही अडचण नसून त्याने रोज शाळेत यावे एवढीच शाळेची अपेक्षा आहे. हुशार असलेल्या आदर्शकडून आम्हाला त्याची रोजची उपस्थिती महत्त्वाची आहे.