Solapur- Hyderabad Flight: सोलापूरकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अन् मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूर विमानतळावरुन आणखी एका शहरासाठी विमानसेवा सुरु होणार आहे. सोलापूरमधून हैद्राबादला जाण्यासाठी 17 एप्रिलपासून विमानसेवा सुरु होणार आहे. यामुळे अवघ्या तासाभरात हैद्राबादला जाणे शक्य होणार आहे. या विमानसेवेमुळे सोलापूरच्या हवाई कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळणार आहे.
Nashik News: पत्नीचे इंस्टाग्रामवर चॅट, पतीचा राग अनावर, भर रस्त्यात तिच्या सोबत त्याने...
सोलापूर- हैद्राबाद विमानसेवा सुरु होणार!
सोलापूरकरांसाठी विमानसेवेच्या क्षेत्रातून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. सोलापूर-गोवा आणि सोलापूर-मुंबई या विमानसेवांनंतर आता सोलापूर ते हैदराबाद ही थेट विमानसेवा देखील सुरू होणार आहे. 'फ्लाय ९१' (Fly 91) या कंपनीमार्फत ही सेवा पुरवली जाणार असून, १७ एप्रिलपासून या मार्गावर विमान उड्डाण करेल. विशेष म्हणजे, या प्रवासासाठी तिकीट बुकिंगला आता अधिकृतपणे सुरुवात झाली आहे.
पाहा वेळापत्रक आणि तिकीट दर!
सुरुवातीच्या टप्प्यात ही सेवा आठवड्यातील पाच दिवस उपलब्ध असेल. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या पाच दिवशी प्रवाशांना सोलापूर ते हैदराबाद असा प्रवास करता येईल. शनिवार आणि रविवार मात्र ही सेवा उपलब्ध नसेल. हे विमान दुपारी ३:२० वाजता सोलापूर विमानतळावरून विमान उड्डाण करेल आणि ४:२५ वाजता हैदराबादला पोहोचेल.
सायंकाळी ४:५० वाजता हैदराबादवरून विमान निघेल आणि ५:५० वाजता सोलापुरात दाखल होईल. सुमारे १ तास ५ मिनिटांच्या या प्रवासासाठी प्रवाशांना साधारण ३८०० रुपये मोजावे लागणार आहेत. हैदराबाद हे व्यापार आणि शिक्षणाचे मोठे केंद्र असल्याने या सेवेचा सोलापुरातील व्यापारी वर्ग आणि विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world