Solapur News: भाजपला रोखण्यासाठी शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र; दोन्ही राष्ट्रवादीही सोबत

Solapur News: राज्यात एकमेकांच्या विरोधात असलेले शिंदे आणि ठाकरे गट तसेच अजित पवार आणि शरद पवार गट बार्शीत मात्र एकाच मंचावर दिसणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

सौरभ वाघमारे, सोलापूर

राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो, याचा प्रत्यय बार्शीत आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यात भाजपविरुद्ध सर्व पक्ष अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना (UBT), शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी एकत्र येत 'महाआघाडी' स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

दिलीप सोपल यांची सोशल मीडिया पोस्ट

ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून या महाआघाडीची घोषणा केली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना या नव्या समीकरणाची माहिती देत मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सोपल यांच्या या एका पोस्टने संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले आहे.

(नक्की वाचा-  Rain Alert: महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट! 26 जानेवारीपर्यंत 7 जिल्ह्यांत पावसाचा इशारा; शेतकरी चिंतेत)

भाजपला एकटे पाडण्याची रणनीती 

बार्शीत राजेंद्र राऊत यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी सर्व विरोधकांनी गट-तट बाजूला ठेवून हातमिळवणी केली आहे. राज्यात एकमेकांच्या विरोधात असलेले शिंदे आणि ठाकरे गट तसेच अजित पवार आणि शरद पवार गट बार्शीत मात्र एकाच मंचावर दिसणार आहेत. या महाआघाडीचे नेतृत्व आमदार दिलीप सोपल करत असून, त्यांच्यासमोर भाजपचे राजेंद्र राऊत यांचे कडवे आव्हान असणार आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत बार्शीचे राजकीय समीकरण

महाआघाडी-  ठाकरे गटाचे दिलीप सोपल (आमदार), शिवसेना (दोन्ही), राष्ट्रवादी (दोन्ही) एकत्र 
महायुती - भाजप राजेंद्र राऊत (माजी आमदार), स्वबळावर किंवा मित्रपक्षांसह लढण्याची तयारी 

Advertisement

(नक्की वाचा-  Badlapur News: बदलापुरात शिवसेनेच्या नगरसेवकाला भररस्त्यात बेदम मारहाण; भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल)

बार्शी नगरपालिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांच्या भाजप गटाने यश मिळवल्यानंतर सोपल गट सावध झाला आहे. जिल्हा परिषदेवर आपली पकड मजबूत करण्यासाठी ही महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे. "स्थानिक विकास आणि हुकूमशाही मोडून काढणे" हे या महाआघाडीचे ब्रीदवाक्य असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.

Topics mentioned in this article