Akola Jawan : अयोध्यात कर्तव्यावर असताना अकोल्याच्या भूमिपुत्राला वीरमरण, गावात शोककळा

अयोध्यामध्ये आपले कर्तव्य बजावत असताना अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथील जवानाला वीरमरण आलं आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Ayodhya News : अयोध्यामध्ये आपले कर्तव्य बजावत असताना अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथील जवानाला वीरमरण आलं आहे. नितेश घाटे असं वीर जवानाचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान त्यांचे पार्थिव उद्या मूळ गावी आणून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

अकोला तालुक्यामधील कुरणखेड या गावचे भूमिपुत्र असलेले नितेश मधुकर घाटे गेल्या पंधरा वर्षापासून भारतीय सैन्यात मराठा बटालियनमध्ये सेवा देत होते.  दरम्यान निलेश घाटे यांची गेल्या काही दिवसापासून अयोध्या येथे ड्युटी सुरू होती. मात्र आपल्या कर्तव्यावर असताना त्यांना विद्यूत शॉक लागून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची माहिती कुरणखेड येथे पोहोचताच संपूर्ण कुरणखेड गावात शोककळा पसरली आहे. घाटे परिवारात मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून कुरणखेड गावासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. उद्या कुरणखेड येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.

नक्की वाचा - Desire to die: शहीद जवानाच्या पत्नीची इच्छा मरणाची मागणी, म्हणाली मी पूर्णपणे खचले, नक्की काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, विजेचा झटका लागल्याने जवानाचा मृत्यू झाला आहे. मात्र हा झटका कसा लागला याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. त्यांचे पार्थिव उद्या मूळगावी आणून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article