Operation Sindoor : जळगावात आनंदोत्सव, ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी जवानाचं अनोख्या पद्धतीने स्वागत

ऑपरेशन सिंदूर यशस्वी राबवून जवान सुखरूप गावात परत आल्याने ग्रामस्थांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, प्रतिनिधी

ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी जवान राहुल परशुराम शेलार पाचोरा तालुक्यातील वरखेडी आपल्या गावी आल्याने ग्रामस्थांनी घोड्यावरून मिरवणूक काढत अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं. जम्मू कश्मीर पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले. तसेच अनेक दहशतवाद्यांना कंठस्थान घालून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. या ऑपरेशन शेंदूरमध्ये भारतीय सैन्य दलाने केलेल्या कामगिरीचे देशभरात कौतुक केले जात आहे. 

(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ऑपरेशन सिंदूरमध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातल्या वरखेडी येथील जवान राहुल परशुराम शेलार यांनी देखील सहभाग घेतला होता. हे ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर राहुल शेलार हे सुखरूप आपल्या गावी परतले असून ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात जवानाची घोड्यावर मिरवणूक काढत अनोखे स्वागत केले. 

Advertisement

नक्की वाचा - Maharashtra Rain : नागरिकांनो घरातच थांबा, मुंबईसह 'या' 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट

राहुल शेलार हे 2016 मध्ये सैन्य दलात दाखल झाले होते. अभियांत्रिकी विभागात सेवा बजावून दोन वर्षापासून ते जम्मू कश्मीर मधील सीमावर्ती भागात कर्तव्यावर होते. पहलगाम आल्यानंतर राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये राहुल शेलार यांचा सहभाग होता. मात्र भारत पाक युद्धविरामाच्या घोषणेनंतर ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर तणावाची परिस्थिती निवडली असून जवान राहुल शेलार हे सुट्टीवर आपल्या मूळ गावी वरखेडी येथे परतले. दरम्यान वरखडी येथील ग्रामस्थांनी राहुल शेलार यांची ढोल ताशांच्या गजरात गावातून घोड्यावर मिरवणूक काढत अनोखे स्वागत केले. या स्वागत मिरवणुकीत जवानाची आई पत्नी व कुटुंबीय तसेच सरपंच सविता सोनवणे उपसरपंच प्रतिभा पाटील यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी ग्रामस्थ विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता.

Advertisement
Topics mentioned in this article