नांदेडमधील जवानाला लेह येथे वीरमरण, आज होणार अंतिम संस्कार

काही दिवसांपूर्वीच त्यांची तब्येत बिघडली होता. तेव्हापासून ते चंदीगड येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र 25 नोंव्हेंबर 2024 रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

जाहिरात
Read Time: 1 min

योगेश लाटकर, नांदेड

लेह येथे कर्तव्य बजावताना नांदेड येथील जवान शहीद झाला आहे. मुखेड तालुक्यातील हिरानगर तांडा येथील जवान हवलदार सुधाकर शंकर राठोड हे शहीद झाले आहेत. थंडी आणि बर्फाचा प्रभाव झाल्याने सुधाकर राठोड यांचा मृत्यू झाला. 

हाडं गोठावणाऱ्या थंडीत देशांची सेवा करताना राठोड यांना वीरमरण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची तब्येत बिघडली होता. तेव्हापासून ते चंदीगड येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र 25 नोंव्हेंबर 2024 रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

(नक्की वाचा-  स्थिर सरकारचा होणार महाराष्ट्राला फायदा, शेअर मार्केटमधील तेजीचा अर्थ काय?)

आज (26 नोव्हेंबर) त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी मुखेड तालुक्यातील  हिरानगर तांडा येथे येणार आहे. तेथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. हवलदार सुधाकर शंकर राठोड हे 127 लाईट एअर डिफेन्स रेजिमेंटचे जवान होते. 

(नक्की वाचा- निवडणुकीत भोपळा, आता इंजिनही जाणार? राज ठाकरेंच्या मनसेचं काय चुकलं?)

सुधाकर राठोड यांच्या पश्चात त्यांच्या आई धोंड्याबाई शंकर राठोड, भाऊ मधुकर शंकर राठोड, पत्नी आशा सुधाकर राठोड, मुलगा ओम सुधाकर राठोड (वय 8 वर्ष), मुलगी सुधाकर राठोड (वय 6 वर्ष) आहेत. 

Advertisement
Topics mentioned in this article