शरद सातपुते, प्रतिनिधी
Special Railway Trains For Ashadhi Wari 2026 : आषाढी एकादशी निमित्ताने सांगलीच्या मिरजेतून पंढरपूरसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत.एकादशी निमित्ताने लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तीन अतिरिक्त रेल्वे गाड्या जाहीर केल्या आहेत.यामध्ये नागपूर-मिरज,कोल्हापूर-कुर्डूवाडी आणि पुणे-मिरज या मार्गावरील विशेष गाड्यांमुळे मिरज,सांगली,कोल्हापूर,पुणे,सांगोला आणि पंढरपूर परिसरातील भाविकांची सोय होणार आहे.त्यामुळे आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
इथे पाहा विशेष रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक
आषाढी एकादशी यात्रेनिमित्त भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे पंढरपूर वारीसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहेत.कोल्हापूर-कुडुवाडी-कोल्हापूर आणि पुणे-मिरज-पुणे या मार्गावर या आषाढी वारी विशेष गाड्या धावणार आहेत.रेल्वे प्रशासनाच्या वेळापत्रकानुसार कोल्हापूर-कुईवाडी-कोल्हापूर विशेष अनारक्षित गाडी 22 जुलै ते 29 जुलै या कालावधीत दररोज सोडण्यात येणार आहे.ही गाडी मिरज, आरग, बेळंकी, सलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड,म्हैसाळ,पंढरपूर या स्थानकात थांबणार आहे.
नक्की वाचा >> मन हेलावून टाकणारा फुटपाथवरचा 'तो' एक क्षण होतोय व्हायरल, आनंद महिंद्राही मदतीसाठी सरसावले, पाहा Video
आषाढी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना दिलासा
पुणे-मिरज-पुणे विशेष अनारक्षित गाडी 23 जुलै ते 29 जुलै या कालावधीत दररोज पंढरपूरमार्गे धावणार आहे.पुण्याहून सकाळी 8:40 वाजता सुटणारी ही गाडी सायंकाळी 6:45 वाजता मिरज येथे पोहोचेल.परतीच्या प्रवासात मिरजहून सायंकाळी साडेसात वाजता सुटून पंढरपूर मार्गे पहाटे साडेचार वाजता पुण्यात पोहोचेल.या विशेष गाड्यांमुळे पंढरपूरला आषाढी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार असून सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, जत परिसरातील प्रवाशांना व वारकऱ्यांना ही रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world