जाहिरात

मन हेलावून टाकणारा फुटपाथवरचा 'तो' एक क्षण होतोय व्हायरल, आनंद महिंद्राही मदतीसाठी सरसावले, पाहा Video

फुटपाथवर तुटलेलं व्हायलिन वाजवून उदरनिर्वाह करणारे 80 वर्षांचे वृद्ध भगवान मल्लिक यांचा व्हायरल व्हिडीओनं अनेकांना भावुक केलं आहे. व्हायलिन वाजवतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

मन हेलावून टाकणारा फुटपाथवरचा 'तो' एक क्षण होतोय व्हायरल, आनंद महिंद्राही मदतीसाठी सरसावले, पाहा Video
Anand Mahindra Viral Post

Anand Mahindta X Post Viral : फुटपाथवर तुटलेलं व्हायलिन वाजवून उदरनिर्वाह करणारे 80 वर्षांचे वृद्ध भगवान मल्लिक यांचा व्हायरल व्हिडीओनं अनेकांना भावुक केलं आहे. व्हायलिन वाजवतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. मल्लिक जवळपास 40 वर्ष जुनं तुटलेलं व्हायलिन वाजवत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस शरीर कमकुवत होत असतानाही मल्लिक या व्हायलिनच्या मदतीने 100 रुपये कमावतात.याच पैशांच्या साहय्याने ते त्यांचा संसार प्रपंचाचा गाडा हाकतात. या वृद्ध कलाकाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आनंद महिंद्रा त्यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. इंटरनेटवर भगवान मल्लिक यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहता वर्ग निर्माण झाला आहे.

अनेक वर्षांपासून रस्त्यावर वाजवतात व्हायलिन

भगवान मल्लिक अनेक वर्षांपासून कोलकाताच्या रस्त्यावर व्हायलिन वाजवतात. लहानपणीच त्यांच्या पालकांचा मृत्यू झाला होता.त्यांच्या वडिलांनी त्यांना व्हायलिन वाजवणं शिकवलं होतं. वडिलांच्या निधनानंतर हीच कला त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली. 80 वर्षांच्या वयातली भगवान मल्लिक दररोज संध्याकाळी रस्त्याच्या बाजूला व्हायलिन वाजवतात. त्यांची पत्नीही नेहमी त्यांच्या मनोबल वाढवते. 

 नक्की वाचा >>Ind vs IRE : वैभव सूर्यवंशीला प्लेईंग XI मधून बाहेर ठेवलं, चाहते भडकले, गंभीर विरोधात मिम्सचा पाऊस

व्हिडीओ पाहून भावुक झाले आनंद महिंद्रा

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, त्यांना सुद्धा या कलाकाराची मदत करायची आहे. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचण्यासाठी लोकांनी भगवान मल्लिक यांच्याबद्दलची माहिती शेअर करावी. कंटेट क्रिएटर आराधना चटर्जीने सर्वात आधी भगवान मलिकची स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर अनेक कंटेन्ट क्रिएटर्सने हा व्हिडीओ शेअर केला. भगवान मल्लिक यांचा हा व्हिडीओ एक्सवर @VertigoWarrior नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास 2.65 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 1800 हून जास्त लाईक्स मिळाले आहेत. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com