दहावी बोर्डाचा निकाल जाहीर; मुलींची बाजी, कोकणही अव्वल, इतर जिल्ह्यांचं काय?

राज्य शिक्षण मंडळाकडून दुपारी 1 वाजता निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यावेळी तुम्ही ऑनलाइन गुणपत्रिका पाहू शकता.  

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

अखेर दहावी बोर्डाचा निकाल समोर आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या SSC बोर्डाच्या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभाग अव्वल आला आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून दुपारी 1 वाजता निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यावेळी तुम्ही ऑनलाइन गुणपत्रिका पाहू शकता.  

दरम्यान राज्य शिक्षण मंडळाकडून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्याची दहावीच्या निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यंदा 2023-24 राज्याचा दहावीचा निकाल  95.81 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल सर्वाधिक म्हणजे 97.21 टक्के लागला असून मुलांचा टक्का 94.56 पर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे मुलींचा निकाल मुलांपेक्षा 2.65 टक्क्यांनी अधिक लागला आहे.
  
राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99  टक्के लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला असून तो 94.73 टक्के इतका आहे.

विभागनिहाय निकाल
पुणे - 96.44
नागपुर - 94.73
संभाजीनगर - 95.19
मुंबई - 95.83
कोल्हापूर - 97.45
अमरावती - 95.58
नाशिक - 95.28
लातूर - 95.27
कोकण - 99.01

नक्की वाचा - 'पोर्शे, माझी आवडती कार', 'माझा बाप बिल्डर असता तर'; पुण्यात काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन

कुठे पाहाल निकाल?
निकाल पाहण्यासाठी क्लिक करा...

Maharashtra 10th SSC Result 2024 Website Link 

https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://sscresult.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

https://results.targetpublications.org