जाहिरात

'पोर्शे, माझी आवडती कार', 'माझा बाप बिल्डर असता तर'; पुण्यात काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन

अपघाताच्या निषेधार्थ पुणे काँग्रेसने भव्य निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. या निबंध स्पर्धेची राज्यभरात चर्चा असून स्पर्धेचे विषय सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. 

'पोर्शे, माझी आवडती कार', 'माझा बाप बिल्डर असता तर'; पुण्यात काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन
पुणे:

पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्शे कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. या घटनेत एक अल्पवयीन मुलगा पोर्शे कार चालवित होता. या अपराधानंतर बाल न्याय बोर्डाने अल्पवयीन आरोपीला 'अपघात' या विषयावर 300 शब्दात निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली होती. या घटनेनंतर पुणेकरांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. पुण्यातील वाढणारं ड्रग्सचं जाळं थांबवण्यासाठी राज्य सरकारने पाऊले उचलण्याची गरज असल्याची भूमिका धंगेकर यांनी यापूर्वीही व्यक्त केली आहे.  

नोंदणी नसलेली पोर्शे कार चालवणाऱ्या आणि अपघातात दोन निष्पाप तरुणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपी मुलाला जामीन देताना 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देण्यात आली होती. 300 शब्दांच्या निबंधाव्यतिरिक्त वाहतूक पोलिसांसोबत 15 दिवस काम करण्याची शिक्षाही त्याला सुनावण्यात आली. दारूच्या नशेत कार चालवत दोन तरुणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला इतकी लहान शिक्षा दिल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.  अपघाताच्या निषेधार्थ पुणे काँग्रेसने भव्य निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. या निबंध स्पर्धेची राज्यभरात चर्चा असून स्पर्धेचे विषय सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. 

काय आहे निबंध स्पर्धेचे विषय ?

1. माझी आवडती कार (पोर्शे, फरारी, मर्सिडिज की इतर)

2. दारुचे दुष्परिणाम

3. माझा बाप बिल्डर असता तर?

4. मी खरच पोलीस अधिकारी झालो तर?

नक्की वाचा - कार अपघातानंतर ड्रायव्हरला घरात कोंडलं, अग्रवाल कुटुंबाच्या डोक्यात नेमकं काय सुरू होतं? पोलिसांनी सांगितलं...

पुण्यात 19 मे रोजी रविवारी एका अल्पवयीन बिल्डरच्या अल्पवयीन मद्यधुंद पुत्राने भरधाव पोर्शे कार चालवून दोघांना उडवले होते. या अपघातात एका तरुणाचा आणि एका तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आरोपी बिल्डर पुत्राला बाल न्यायालयाने अपघातावर निबंध आणि 15 दिवस आरटीओमध्ये काम करण्यास सांगून जामीन दिला होता. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुण्यात आणि देशात संतापाची लाट उसळली होती आणि म्हणूनच आज या घटनेचा निषेध करण्यासाठी अपघात झाला. त्या ठिकाणी पुणे युवक काँग्रेसने अनोखी स्पर्धा आयोजित केली. या ठिकाणी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे विषय देखील खास आहे. या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावणाऱ्याला 11,111 रुपये दिले जाणार आहे. कल्याणीनगर परिसरात बॉलर पबसमोर ही निबंध स्पर्धा सुरू आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस दिले जाणार आहे.

Switch To Dark/Light Mode
Previous Article
आता पती पत्नींच्या मार्गातला काटा का ठरतोय? अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर
'पोर्शे, माझी आवडती कार', 'माझा बाप बिल्डर असता तर'; पुण्यात काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन
Sangli Murder case Kabaddi player killed in Sanglis Jamwadi
Next Article
कानाखाली लगावली, बदला म्हणून 5 अल्पवयीन मुलांनी केलं भयंकर कृत्य, तुम्ही ही थक्क व्हाल