SSC Result Maharashtra Board : राज्यातील 49 शाळा 'ढ', दहावीचे सर्व विद्यार्थी नापास; मुंबई-पुण्यातील शाळांचाही समावेश

Maharashtra Board SSC 10th Result 2025 : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 1.71 टक्क्यांनी कमी झाला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

SSC Result Maharashtra Board : यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वात जास्त 99.32 टक्के इतका लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा असून गडचिरोली जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी 82.67 टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 1.71 टक्क्यांनी कमी झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यंदा राज्यातील 213 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 टक्के गुण मिळाले आहे. यामध्ये लातूरचे 100 विद्यार्थी आहे.  दरम्यान राज्यातील एकूण 49 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. यामध्ये लातूरच्या शाळांची संख्या सर्वाधिक 10 आहेत. त्याशिवाय शून्य टक्के निकाल लागणाऱ्यांमधील शाळांत पुणे 7, नागपूर 8, संभाजीनगर 9, मुंबई 5, कोल्हापूर 1, अमरावती 4, नाशिक 4, लातूर 10, कोकण 1 शाळांचा समावेश आहे. या शाळेतील दहावीचा एकही विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकला नाही. लातूर विभागातील १० शाळांचा निकाल शून्य टक्के लागला असून कोल्हापूर आणि कोकण या विभागातील एक-एक शाळाचा निकाल शून्य टक्के लागला आहे. 

Advertisement

नक्की वाचा - SSC Result Maharashtra Board : लातूरमधील विद्यार्थ्यांची झिरो ते हिरो कामगिरी, दहावीच्या निकालानंतर होतेय चर्चा

 
राज्यातील एकूण ४९ शाळांचा निकाल ० टक्के 

49 शाळांमध्ये 0 टक्के निकाल 

पुणे ७ शाळा 
नागपूर ८ शाळा 
छत्रपती संभाजीनगर ९ शाळा 
मुंबई ५ शाळा 
कोल्हापूर १ शाळा 
अमरावती ४ शाळा 
नाशिक ४ शाळा 
लातूर १० शाळा 
कोकण १ शाळा
 

एकूण २११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

नागपूर ३
संभाजी नगर ४०
मुंबई ८
कोल्हापूर १२
अमरावती ११
नाशिक २
लातूर ११३
कोकण ९