एसटीच्या शिवशाही बसचा एक वाईट अनुभव प्रवाशांना आला. हा अनुभव पालघर ते पुणे प्रवासा दरम्यानचा होता. एसटी महामंडळाच्या पालघर आगारातील बसेसची देखभाल दुरुस्ती अभावी दुरावस्था झाली आहे. त्यामुळे भंगार बसेस प्रवाशांना घेऊन रस्त्यावर धावत आहेत, असा आरोप प्रवासी करत आहेत. रविवारी दुपारी पालघर एसटी आगारातून पालघर स्वारगेट ही शिवशाहीची बस सुटली. पण ती स्वारगेचपर्यंत पोहोचली नाही. त्या आधी एक भयंक अनुभव प्रवाशांना आला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या शिवशाही बसचं एसीच्या इथलं छप्पर गाडी धावत असतानाच उडून गेलं. त्यामुळ एकच खळबळ उडाली. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावर टेन नाका दुर्वेस गावा दरम्यान भरधाव वेगातील शिवशाही बस चालली होती. त्याच वेळी त्याचं छप्पर उडून गेलं. ही बाब प्रवाशांनी वाहकाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर बस दुर्वेसच्या हद्दीत थांबवण्यात आली. त्याच वेळी पालघर आगाराबरोबर संपर्क साधला गेला. पण हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही असं प्रवाशी सांगतात.
ट्रेंडिंग बातमी - Cyber crime: डिजिटल अरेस्टची भीती दाखवून जेष्ठ नागरिकाला 3 कोटींचा गंडा
एक दोन नाही तर तब्बल चार तासांच्या प्रतीक्षेनंतर पालघर आगारातून दुसरी बस पाठवण्यात आली. शिवशाही बस दुर्वेसला पोहोचल्या नंतर बावीस प्रवाशांना घेऊन पर्यायी शिवशाही बस पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्यामुळे प्रवाशांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला. उडून गेलेला एसीचा वेंट दोरीने बांधून ठेवल्याची माहिती आता समोर येत आहे. एसटी महामंडळाच्या गलथान कारभारा विरोधात प्रवाशांकडून यावेळी संताप व्यक्त करण्यात आला.
प्राची पाटील या याच बसमधून प्रवास करत होत्या. पुण्याला जाण्यासाठी एसटी शिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आम्हाला अशा बसमधून प्रवास करावा लागतो. अनेक वेळी बराच वेळ बसची वाट पाहावी लागते. काही वेळी बस रद्द करण्यात येते पण त्याची माहिती दिली जात नाही, असं ही त्या म्हणाल्या. ज्या बस येतात त्या खराब येतात. आम्ही प्रवास करत असलेल्या बसचे एका ठिकाणचे छत उडाले. त्यामुळे आम्हाला अडकून पडावं लागलं. चार तासानंतर बस आली, त्यानंतर पुढचा प्रवास सुरू झाला असं ही त्या म्हणाल्या. एसटीने याबाबत लक्ष देण्याची गरज असल्याचं ही त्या म्हणाल्या.