जाहिरात

Fake Doctor News: 'मी लंडनचा डॉक्टर' सांगून हार्ट सर्जरी केली, 7 जणांचा जीव गेला.. 'मुन्नाभाई'चा भयंकर प्रताप!

Fake Doctor Heart Surgery 7 Death: वकिलाने यापूर्वी दमोह जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर तक्रार दाखल केली होती. काही रुग्ण जे वाचले, ते आमच्याकडे आले आणि त्यांनी घटनेबद्दल सांगितले. 

Fake Doctor News: 'मी लंडनचा डॉक्टर' सांगून हार्ट सर्जरी केली, 7 जणांचा जीव गेला.. 'मुन्नाभाई'चा भयंकर प्रताप!
MP Fake Doctor News

MP Fake Doctor News:  मध्य प्रदेशातील दमोह येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे,  एका बनावट डॉक्टरने ऑपरेशन करून 7 लोकांचा जीव घेतल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.  विक्रमादित्य यादव असे या डॉक्टरचे नाव असून त्याने लंडनमधून शिकून आलो असल्याचे सांगत  डॉ. एन. जॉन कीम नाव लावून  एका रुग्णालयात हृदयरोगतज्ज्ञ म्हणून काम करत होता.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे संपूर्ण प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. एन. जॉन कीम नावाचा प्रसिद्ध ब्रिटिश डॉक्टर असल्याचे भासवून ख्रिश्चन मिशनरी रुग्णालयात हृदयरोगतज्ज्ञ म्हणून नोकरी स्वीकारली. त्यानंतर त्याने अनेक शस्त्रक्रिया झाल्या. आरोपीने ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया केली त्या सर्व रुग्णांचा नंतर मृत्यू झाला. 7 जणांच्या मृत्यूनंतर ही बाब उघडकीस आली. तपासादरम्यान आरोपी बनावट डॉक्टरचे खरे नाव नरेंद्र विक्रमादित्य यादव असल्याचे आढळून आले.

याबाबत अधिवक्ता आणि बाल कल्याण समितीचे जिल्हा अध्यक्ष दीपक तिवारी यांनी दावा केला की अधिकृतपणे मृतांची संख्या 7 आहे, परंतु प्रत्यक्ष संख्या यापेक्षा खूप जास्त आहे. वकिलाने यापूर्वी दमोह जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर तक्रार दाखल केली होती. काही रुग्ण जे वाचले, ते आमच्याकडे आले आणि त्यांनी घटनेबद्दल सांगितले. 

नक्की वाचा - Amit Gorkhe News: 'खोटारडेपणाचा निषेध...', मंगेशकर हॉस्पिटलच्या अहवालावर आमदार अमित गोरखेंचा संताप

कसा झाला उलगडा?

त्यांनी सांगितले की ते त्यांच्या वडिलांना रुग्णालयात घेऊन गेले होते आणि ती व्यक्ती शस्त्रक्रिया करण्यास तयार होती. पण त्यांना थोडी भीती वाटली, म्हणून ते त्यांच्या वडिलांना जबलपूरला घेऊन गेले. मग आम्हाला कळले की रुग्णालयात एक बनावट डॉक्टर काम करत आहे. खरा डॉक्टर यूकेमध्ये आहे. या व्यक्तीचे नाव नरेंद्र यादव आहे. त्याच्याविरुद्ध हैदराबादमध्ये गुन्हा दाखल आहे आणि त्याने कधीही त्याचे खरे कागदपत्रे दाखवली नाहीत."

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानुंगो म्हणाले, "मिशनरी हॉस्पिटलमध्ये एका बनावट डॉक्टरने रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्याची तक्रार आम्हाला मिळाली. आम्हाला असेही सांगण्यात आले की मिशनरी हॉस्पिटल आयुष्मान भारत योजनेशी देखील संबंधित आहे आणि त्यासाठी सरकारकडून पैसे घेत आहे. ही एक गंभीर तक्रार आहे. आम्ही या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि सध्या चौकशी सुरू आहे.

Sanjeev Sanyal : आधी हटवण्याचे आदेश, 2 दिवसांनी पुन्हा कुलपतीपदी, पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नक्की काय सुरू आहे?

दरम्यान, या आरोपांनंतर जिल्हा तपास पथकाने रुग्णालयातील सर्व कागदपत्रे जप्त केली आहेत. बनावट डॉक्टरने प्रसिद्ध ब्रिटिश डॉक्टरांसारखीच बनावट कागदपत्रे सादर केल्याचे आढळून आले. आरोपीवर हैदराबादमध्ये दाखल झालेल्या गुन्हेगारी खटल्यासह अनेक वादांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.  आम्ही सध्या मिशनरी हॉस्पिटलमध्ये झालेल्या अनेक मृत्यूंच्या प्रकरणाची चौकशी करत आहोत." तपास पूर्ण झाल्यानंतर ते निवेदन देतील असे दामोहचे जिल्हाधिकारी सुधीर कोचर यांनी म्हटले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: