लाल परी झाली मालामाल; नोव्हेंबर महिन्यात विक्रमी उत्पन्न, मात्र तरीही तिकीट दरवाढीची शक्यता

कुणाच्याही खिशाला परवडणारी आणि सर्वसामान्यांना गावोगावी पोहोचवणारी लाल परी आता मालामाल झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

कुणाच्याही खिशाला परवडणारी आणि सर्वसामान्यांना गावोगावी पोहोचवणारी लाल परी आता मालामाल झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात लालपरीने मोठी कमाई केली आहे. या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात दिवाळी, भाऊबीज, तुळशीचं लक्ष असे अनेक सण होते. त्यामुळे या महिन्यात मोठ्या संख्येने लोकांनी प्रवास केला. 

नक्की वाचा - फडणवीसांच्या कानात हळूच सांगितलं गुपित; विधानभवनात हनुमान चालिसेचं पठण झाल्यानंतर काय घडलं?

प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे तब्बल 941 कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न  नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी 60 लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे 31.36 कोटी रुपये उत्पन्न प्रतिदिन मिळालं आहे. गेल्या वर्षी याच काळातील उत्पन्नापेक्षा यंदाचं उत्पन्न सुमारे 26 कोटी रुपयांनी जास्त आहे. एसटीचे प्रवासी उत्पन्न जरी वाढलेले असले तरी, त्याप्रमाणामध्ये एसटीचा खर्च देखील वाढल्याची माहिती आहे.   

नक्की वाचा - ​​​​​​​One Nation, One Election : 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

इंधनाचे वाढते दर, कर्मचाऱ्यांची वेतन वाढ, टायर व सुट्ट्या  भागांच्या दरामध्ये झालेली वाढ याचा परिणाम एसटीचा खर्च वाढीवर झाला आहे. त्यामुळे संचित तोटा 11 हजार कोटी पर्यंत पोहोचला आहे. तसेच या नोव्हेंबर महिन्यात नियमित खर्चाबरोबरच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिल्यामुळे सुमारे 52 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा एसटीच्या तिजोरीवर पडला आहे. याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची हजारो कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. या सर्वांचा विचार करुन नाईलाजास्तव उत्पन्न आणि खर्चातील ताळमेळ राखण्यासाठी एसटीने तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, तसा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. 
 

Advertisement