जाहिरात

गणपतीत कोकणात जाताय? बिनधास्त जा! एसटीने घेतला मोठा निर्णय

गणरायाचे आगमन हे 7 सप्टेबरला होत आहे. कोकणातील गणेशोत्सव आणि एसटी यांचे अनोखे नाते आहे. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची पहीली पसंती असते ती म्हणजे एसटी.

गणपतीत कोकणात जाताय? बिनधास्त जा! एसटीने घेतला मोठा निर्णय
मुंबई:

कोकणात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या उत्सवाला मुंबईतून चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात जातात. यावेळी गणरायाचे आगमन हे 7 सप्टेबरला होत आहे. कोकणातील गणेशोत्सव आणि एसटी यांचे अनोखे नाते आहे. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची पहीली पसंती असते ती म्हणजे एसटी. अनेक चाकरमानी गणपतीत आपलं गाव गाठण्यासाठी एसटीलाच पसंती देतात. त्यामुळे एसटीला मोठी मागणी या काळात असते. आरक्षण मिळणे कठीण होवून जाते. गाड्याही तुडूंब भरून जातात. हा अनुभव पाहात आता एसटीने मोठा निर्णय घेतला आहे. एसटीने घेतलेल्या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

07 सप्टेंबर 2024  रोजी  गणरायाचे आगमन होत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान तब्बल  4 हजार 300 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षण ही करता येणार आहे. शिवाय 75 वर्षाच्या नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे. 2 सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी  3 हजार 500 एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये 800 बसेसची वाढ करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग बातमी - 'राजकारणात एक तर मी राहीन, नाहीतर फडणवीस राहतील'

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे 4,300 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. या बसेसचे आरक्षण npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिवाय बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे उपलब्ध होणार आहे.

ट्रेंडिंग बातमी - 'फडणवीसांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना शंभर जन्म घ्यावे लागतील'

 गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटीचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
हैदराबादला स्वतंत्र मुस्लीम देश बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या निजामानं कशी पत्करली शरणागती?
गणपतीत कोकणात जाताय? बिनधास्त जा! एसटीने घेतला मोठा निर्णय
Good news for Mumbai! You can now register property at any joint sub-registrar office
Next Article
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मालमत्तेच्या दस्त नोंदणीसाठी हद्दीची अट रद्द