10 hours ago

आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात टोकन वाटताना झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा वाढला आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढला असून धुळे, नंदूरबार आणि नाशिक भागाच थंडी वाढल्याने रस्त्यांशेजारी शेकोट्या पेटल्याचं दिसत आहे. आज राज्यातील महत्त्वाच्या विषयांमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे. आज मनोज जरांगेंच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Jan 09, 2025 21:15 (IST)

कल्याण स्टेशन परिसरात पोलिसांचा छापा

कल्याण स्टेशन  परिसरात पोलिसांनी छापा टाकला.  वेशा व्यवसाय करणाऱ्या 13 महिलांची त्यातून सुटका करण्यात आली.  वेशा व्यवसायाला भाग पाडणाऱ्या चार दलालाना ही अटक करण्यात आली आहे. दलालांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.  कल्याणच्या महात्मा फुले पोलिसां ही कारवाई केली. 

Jan 09, 2025 16:37 (IST)

संतोष देशमुख हत्ये प्रकरणी अजित पवारांचे मोठे वक्तव्य

संतोष देशमुख हत्या प्रकरणात कितीही मोठा व्यक्ती गुंतला असला तरी त्याला सोडणार नाही. त्याला कठोर शिक्षा केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र पुराव्या अभावी केवळ आरोप करणेही चुकीचे आहे असे सांगत त्यांनी धनंजय मुंडे यांचा बचावही केला आहे. 

Jan 09, 2025 16:11 (IST)

Live Update : शरद पवारांच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलणार?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी मागणी शरद पवारांसमोरच करण्यात आली आहे. जयंत पाटील सध्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोरच ही मागणी केली. मराठा समाजाच्या व्यतिरीक्त नेत्याला प्रदेशाध्यक्ष करा. वेळ देणारा प्रदेशाध्यक्ष असावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. 

Jan 09, 2025 13:35 (IST)

Live Update : पुण्यात येरवडा जेलमधून सुटल्यानंतर मोक्कातील आरोपीने काढली रॅली, Video Viral

येरवडा जेलमध्ये मोक्काअंतर्गत असलेला प्रफुल उर्फ गुड्या गणेश कसबे हा दोन दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आला. त्यानंतर त्याने आणि त्याच्या सुमारे ५०-६० समर्थकांनी येरवडा बाजार परिसरात आलिशान कारमधून रॅली काढली. रॅलीचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. परिसरातील नागरिकांना रॅलीमधील युवकांनी धमकावले होते असे देखील नागरिकांचे म्हणणे आहे. आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय म्हणून रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली. व्हिडिओ आणि घडलेल्या प्रकाराबाबत नागरिकांनी लक्ष्मी नगर (शास्त्रीनगर) पोलीस चौकीमध्ये माहिती दिली पण कारवाई झाली नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. ..

Advertisement
Jan 09, 2025 13:33 (IST)

Live Update : कराडप्रकरणी अद्याप ईडी का लावली नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल

कराडप्रकरणी अद्याप ईडी का लावली नाही? 

Jan 09, 2025 13:32 (IST)

Live Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद

Advertisement
Jan 09, 2025 13:16 (IST)

Jayant Patil: जयंत पाटील हेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहतील..., जितेंद्र आव्हाड

एका गरीब बिचाऱ्या मागासवर्गीय तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. तिथे दर शेती खणली तर फक्त हाडे मिळतील. ज्या स्टोरी येतात त्या मला आफ्रिकेत असल्यासारखं वाटतात.आम्ही धनंजय मुंडेंनी खून केला असं म्हटलेलं नाही.  तुम्ही चार हवालदारांची बदली केली ना? ती का केली? जर चार हलावदार चौकशी प्रभावित करु शकतात मग धनंजय मुंडे करु शकतात ना? हा साधा प्रश्न आहे.

शरद पवारांनी संघांचं कौतुक केलं नाही मात्र भाजपच्या विजयात संघाचा मोठा वाटा आहे, असं

ते म्हणालेत. शरद पवार, जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे हे आगामी निवडणुकांच्या दिशा ठरवतील.

जयंत पाटील हेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहतील. जोपर्यंत  साहेबांची आणि इतरांची बैठक होत नाही, तोपर्यंत

जयंत पाटील यांच्यावर चर्चाही होणार नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. 

Jan 09, 2025 12:52 (IST)

Aditya Thackeray Meet CM Devendra Fadnavis: आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

 शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील  विविध विकासकामांच्या प्रश्नांवर ही भेट झाल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईकरांचा पाणीप्रश्न, दादरमधील टोरेस प्रकरणही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

Advertisement
Jan 09, 2025 12:04 (IST)

Beed News: बीड हत्या प्रकरण: पैठणमध्ये निषेध मोर्चाला सुरुवात

 बीडच्या मत्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हल्लेखोरांना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत असून बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. आज बीडच्या पैठणमध्ये मराठा बांधवांचा मोर्चा निघाला असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. 

Jan 09, 2025 11:58 (IST)

Nitsh Rane: किनारपट्टीवरील मक्तेदारी मोडून काढणार, नितेश राणेंचा इशारा

'मस्त्य विभागाच्या माध्यमातून किनारपट्टी भागात ९ ठिकाणी ड्रोन पद्धतीचे उद्घाटन झाले आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली १०० दिवसांचा प्लान आखला आहे. त्याअंतर्गत किनारपट्टी मध्ये मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे उत्पन्न वाढवणे व किनारपट्टी सुरक्षित ठेवणे स्थानिक मच्छीमारांचे नुकसान होते,' अशा ट्रोलर्सना प्रतिबंध घालण्यासाठी याचा वापर आहे. 

'आम्ही सुरक्षेवर काम करणार हे सांगितले होते त्याअनुषंगाने हे पहिले पाऊल आहे. दिवसभरातील अॅक्टीव्हीटी यामुळे कळतील. पोलीस खात्याला सोबत घेऊन या इमेज शेअर केल्या जातील. १२ नॉटिकल माईलपर्यंत मासेमारी करण्याबाबत, एलईडी वापर प्रतिबंध या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करण्याबाबत हे पाऊल टाकले आहे. गस्तीनौका या अवैध प्रयत्नांवर लक्ष ठेवत होते, आता हे पुढचे पाऊल आहे,' असे म्हणत किनारपट्टीवरील मक्तेदारी मोडून काढणार असल्याचा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. 

Jan 09, 2025 11:01 (IST)

HMPV Virus: राज्यात एचएमपीव्हीची एन्ट्री, पंढरपूरात पहिला विलगीकरण कक्ष तयार

राज्यात HMPV व्हायरसने शिरकाव केला आहे. अशातच आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली. पंढरपूर हे राज्यातील मोठे तीर्थक्षेत्र आहे. देशातून या ठिकाणी भाविक येत असतात. या पार्श्वभूमीवर पंढरपूर आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर आली आहे. पंढरपुरात राज्यातील पहिला HMPV वायरसचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. 

Jan 09, 2025 09:42 (IST)

Pandharpur Crime: पंढरपूरमध्ये एकावर कोयत्याने हल्ला

पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकावर कोयत्याने हल्ला

भर वस्तीत मध्यवर्ती ठिकाणी एकावर हल्ला.

वाहतूक पोलीस आल्याने हल्लेखोर फरार.

सकाळी भरचौकात कोयत्याने वार झाल्याने खळबळ.

हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट

Jan 09, 2025 09:03 (IST)

America Los Angeles Forest Fire: अमेरिकेच्या जंगलात भीषण अग्नितांडव, 70 हजार नागरिकांचे स्थलांतर

अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या जंगलात भीषण आग लागल्याचे समोर आले असून ती आग आता शहराच्या दिशेने पसरत आहे. शेकडो झाडे, हजारोंहून अधिक इमारती या आगीच्या भक्ष्यस्थानी आले असून जवळपास 70 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. 

Jan 09, 2025 08:55 (IST)

Badlapur News: बदलापुरात उत्तर भारतीय रहिवाशांची सोसायटीच्या अध्यक्षाला मारहाण

बदलापूरच्या खरवई परिसरात सिद्धी सिटी फेज ५ हे गृहसंकुल आहे. या संकुलात राहणारे काही उत्तर भारतीय रहिवासी नेहमीच मराठी रहिवाशांना दमदाटी करत असल्याचा मराठी रहिवाशांचा आरोप आहे. सोसायटीची पाणीपट्टी थकल्यानं थकीत मेंटेनन्सच्या नोटीस देण्यासाठी गेलेल्या सोसायटीच्या अध्यक्षाला या उत्तर भारतीय रहिवाशांनी मारहाण केली, तसंच यापूर्वी एका गरोदर महिलेच्या अंगावरही एक उत्तर भारतीय रहिवासी धावून गेला होता, अशी रहिवाशांची तक्रार आहे. कल्याणची घटना ताजी असतानाही बदलापूर पूर्व पोलिसांनी याप्रकरणात फक्त एनसी नोंदवून घेतली आहे. त्यामुळे रहिवाशांनी थेट मनसेकडे याबाबत लेखी व्यथा मांडत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

Jan 09, 2025 08:54 (IST)

Jalgaon Crime: जळगावमध्ये गोळीबाराचा थरार, पोलिसांचा तपास सुरु

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना समोर आली असून चाळीसगाव शहरातील पोदार स्कूल जवळ अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक व हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान चाळीसगाव शहरातील बाळू मोरे हत्या प्रकरणातील संशयित सुमित भोसले त्याच्या घरासमोर हा गोळीबार झाल्याची माहिती असून पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्याच्या हेतूने हवेत गोळीबार करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक जिवंत काडतूस तीन काडतूसचे कव्हर आढळून आले आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी एका संशयीताच्या घराची झाडाझडती घेतली असता घरातून घातक हत्यारे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

Jan 09, 2025 08:25 (IST)

Ajit Pawar: अजित पवारांचा पुणे दौरा, साखर संकुल आढावा बैठकीला लावणार हजेरी

अजित पवारांच्या उपस्थितीत साखर संकुल येथे आढावा बैठकीचे आयोजन काही वेळात बैठक सुरू होईल. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचीही उपस्थिती असणार आहे.  सकाळी आठ वाजता अजित पवार साखर संकुल येथे आढावा बैठक घेणार आहेत.  थोड्याच वेळात अजित पवार साखर संकुल येथे दाखल होणार आहेत. 

Jan 09, 2025 07:19 (IST)

Live Update : नाशिकच्या ग्रामीणमध्ये पुन्हा हुडहुडी वाढली; शेकोट्या पेटल्या

नाशिकच्या ग्रामीण भागात पुन्हा अचानक थंडी वाढल्याने मालेगाव, मनमाड परिसरात नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घ्यायला सुरुवात केली आहे. थंडीपासून बचावासाठी नागरिक घराबाहेर पडताना गरम व उबदार कपडे परिधान करत बाहेर पडत आहे. 

Jan 09, 2025 07:19 (IST)

Live Update : वर्ध्यातून 60 दिवसात 632 मोबाइल हरवल्याची सायबरकडे तक्रार

वर्ध्यात गेल्या 60 दिवस म्हणजे दोन महिन्यात तब्बल 632 मोबाइल हरवल्याची तक्रार सायबर सेलकडे देण्यात आली होती. यामध्ये अथक परिश्रम करून सायबर सेलने 202 मोबाइल ट्रेस करून 71 मोबाइल शोधले आहेत. 

Jan 09, 2025 07:17 (IST)

Live Update : मॉर्निंग वॉकिंग गेलेल्या महिलेची हत्या प्रकरणातील आरोपीला अटक

अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत जुना हिंगणा येथे मॉर्निंग वॉकिंगला गेलेल्या सविता ताथोड महिलेची हत्या करण्यात आली होती. दरम्यान जुन्या वादातून मंगळवारी सकाळच्या सुमारास धारदार शस्त्राने हत्या करून आरोपी पसार झाला होता. दरम्यान जुने शहर पोलिसांच्या पथकाने आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या मदतीने चांदूर जवळील सुकळी गावातून धीरज चुंगडे या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेय. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आज न्यायालयासमोर हजर करणार आहेत.