मुंबईसह राज्यभरात 20 मेला सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची धांदल उडाली. राज्यभरातील कित्येक रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत होते. ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या समस्येमुळे वाहतुकीवर मोठा पहिणाम पाहायला मिळाला. मुंबई, पुणे शहरांसह अनेक महामार्गांवर गाड्यांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. यामुळे वेळ वाचवण्यासाठी आणि प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबई मेट्रोने प्रवास केला. या प्रवासाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये योगेश कदम मेट्रोमधून प्रवास करीत असल्याचं दिसत आहे.
नक्की वाचा - Rain Forecast: मुंबई, पुण्यात आजही धो-धो; 9 जिल्ह्यांना मुळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'
या प्रवासादरम्यान त्यांनी मेट्रोमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि सामान्य प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा व सुविधा याबाबत विचारपूस केली. मुंबई मेट्रोचे नियोजन हे सुरक्षित, वेळेवर आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून, भविष्यात सर्व मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर नागरिकांना निश्चितच मोठा फायदा होईल, असा विश्वास कदम यांनी यावेळी व्यक्त केला.
पुण्यातही मोठी वाहतूककोंडी...
पावसामुळे पुणेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण झाले. नुकत्याच उद्घाटन झालेल्या सिंहगड रस्त्यावरील
संपूर्ण उड्डाण पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. उड्डाणपुलावर जवळपास दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
हवामान विभागाचा अलर्ट...
मुंबई , ठाणे , पालघर , रायगड जिल्हांना हवामान खात्याचा येलो अलर्ट
रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट, विजांसह जोरदार पावसाची शक्यता
कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
संभाजीनगर, बीड, धाराशीव जिल्ह्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट