
Rain Alert : मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात काल मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबईत विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. तर पुण्यात झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवरुन पाणी ओसंडून वाहत होतं. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. पुण्यात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. आज देखील मुंबई, पुण्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे. वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, पुणे, पुणे घाट, सातारा , सांगली, जालना, परभणी, हिंगोली,नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळीवाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- Ambarnath News : पावसात लघुशंका करताना विजेचा झटका, अल्पवयीन मुलाचा मृत्यू)
कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा घाट, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि 50-60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात.
अरबी समुद्र खवळण्याची शक्यता
महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा - Kalyan Building Collapse : कल्याणमध्ये इमारत कोसळली, 6 जणांचा मृत्यू
22 ते 24 मे दरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ समुद्र खवळू शकतो. तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world