मंगेश जोशी, जळगाव
सूरतहून प्रयागराजकडे जाणाऱ्या ताप्ती-गंगा एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगाव रेल्वे स्थानकाजवळ ही दगडफेक झाल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे. एका प्रवाशाने X अकाऊंटवर व्हिडीओ ट्वीट करत सर्व प्रसंग सांगितला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, ताप्ती-गंगा एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक सोडल्यानंतर अवघ्या 2 ते 3 किलोमीटरवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. दगडफेकीमुळे बी 6 कोच मधील खिडकीची काच फुटली आहे. रेल्वे प्रवाशाच्या ट्वीटनंतर जळगाव रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Accident News : मित्रांसोबत महाबळेश्वरला फिरायली निघाले, मात्र वाटेतच मृत्यूने गाठलं)
दगडफेकीच्या घटनेमुळे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दगडफेकीच्या घटनेमुळे प्रयागराजकडे जाणाऱ्या या रेल्वे गाडीत प्रवाशांना सुरक्षा मिळण्याची मागणी प्रवाशांची रेल्वे प्रशासनाकडे तसेच रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
(नक्की वाचा- Delhi News: रात्रभर छोले भिजत ठेवले; सकाळी दोघांचे मृतदेह आढळले; कशामुळे जीव गेला?)
उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे आयोजित करण्यात आला आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या काळात या महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.