समाधान कांबळे, हिंगोली
खाजगी क्लासेसच्या शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून बारावीतील विद्यार्थ्यांची रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हिंगोली शहरातील एका खाजगी क्लासेसमध्ये विद्यार्थी बारावीचे शिक्षण घेत होता.
किरण लोंढे असे या विद्यार्थ्याचं नाव असून तो हिंगोली शहरातील जुन्या जिल्हा परिषद ग्राउंडजवळील क्लासमध्ये येथे बारावीचे शिक्षण घेत होता. दरम्यान या क्लासेसची शिकवणी घेणाऱ्या अनिल वानखेडे, सतीश थोरात आणि ज्ञानेश्वर गिरी या शिक्षकांचे क्लासेसमधील मुलींसोबत संबंध होते.
(नक्की वाचा- पुण्यातील नगरसेवकही होता निशाण्यावर, शिवकुमारच्या चौकशीत धक्कादायक खुलासा)
किरण लोंढे या विद्यार्थ्याला याची माहिती होती. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना त्याने का सांगितले, आमची आणि मुलींची बदनामी का केली या कारणावरून किरण लोंढे या विद्यार्थ्यास या शिक्षकांकडून धमक्या दिल्या जात होत्या. वरील तिन्ही शिक्षकांकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या मानसिक त्रास व धमक्यांना कंटाळून किरण लोंढे या विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलत रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या विद्यार्थ्याने कशामुळे आत्महत्या केली याचं कारण एका चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे.
(नक्की वाचा- टपाली मतदान केल्यानंतर 'चमकोगिरी' भोवली; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल)
मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात खाजगी क्लासेसमध्ये शिकवणी करणाऱ्या तीन शिक्षकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यास प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही आरोपी अजून फरार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.