Beed News : पोट दुखू लागल्याने तरुणीला दवाखान्यात नेले; तपासणीनंतर कुटुंबीयांना धक्काच बसला

Beed Crime News : माजलगाव शहरातील 20 वर्षीय विद्यार्थिनीची पंचशीलनगर येथील सुनील विक्रम अलझेंडे (वय 30) याच्यासोबत मैत्री झाली. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर, पीडितेला विश्वासात घेऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, बीड

Beed Crime News : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अनेकदा अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यातून पीडिता गर्भवती राहिली. बीडच्या माजलगाव शहरात ही घटना मे महिन्यात उघडकीस आली. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव शहरातील 20 वर्षीय विद्यार्थिनीची पंचशीलनगर येथील सुनील विक्रम अलझेंडे (वय 30) याच्यासोबत मैत्री झाली. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर, पीडितेला विश्वासात घेऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. तू मला आवडतेस, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे आमिष त्याने तिला दाखवले. 

(नक्की वाचा- Nagpur News : प्रेयसीच्या जळत्या सरणावर तरुणाची उडी; उपस्थितांनी धू धू धुतला)

लग्नाचे आमिष दाखवून तिला घरी नेऊन अत्याचार केला. मागील महिन्यात पीडितेचे पोट दुखायला लागले. त्यानंतर, आई-वडिलांनी तिला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात नेले. तेथे तपासणी केली असता, पीडिता ही साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. 

(नक्की वाचा - WFH Fraud : इन्स्टाग्रामवरील जाहिरातीला भुलली, 'वर्क फ्रॉम होम'च्या बहाण्याने महिलेला 10 लाखांचा गंडा)

घडलेला प्रकार समोर आल्यानंतर पीडितेन कुटुंबीयांच्या मदतीने 8 जून रोजी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात सुनील अलझेंडे विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भोसले हे करत आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article