राज्याचे मुख्य सचिव (chief state secretary) नितीन करीर यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे आज नव्याने मुख्य सचिव पदावर नियुक्ती केली जाणार आहे. आज नितीन करीर यांचा कार्यकाळ आज 30 जून रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे आज नव्याने मुख्य सचिव पदावर नियुक्ती केली जाणार आहे. सुजाता सौनिक यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार सौनिक यांची मुख्य सचिव पदावर नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. त्यांची नियुक्ती झाली तर त्या राज्याच्या पहिल्या महिला (the state will get its first woman chief secretary) मुख्य सचिव ठरतील.
कोण आहेत सुजाता सौनिक?
सुजाता सौनिक या सध्या गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहत आहेत. या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांचं शालेय आणि महाविद्यालीन शिक्षण चंदीगड त्यानंतर पंजाबमध्ये झालं. त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. यापूर्वी त्यांनी कौशल्य विकास, गृहमंत्रालय पदावर अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं आहे.
महाराष्ट्रात आर्थिक सुधारणा विभागाच्या प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक देखील मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले होते.