Heatwave in Maharashtra : यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक 'तापदायक' ठरणार आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये यंदाचा उन्हाळा अधिक कडक असणार असून किमान-कमाल तापमानात मोठी वाढ पाहायला मिळणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. उन्हाळ्यातील तीन महिन्यातील काही दिवस तीव्र उष्णतेच्या झळा देणाऱ्या असतात. मात्र यंदा ही संख्या जास्त असेल असा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे.
पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक-तमिळनाडूच्या उत्तरेकडील भागात उष्णतेची लाट अधिक काळ राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारताच्या पश्चिमेकडील भागात एप्रिल-जूनदरम्यान 10 ते 11 दिवस हिटवेवची शक्यता आयएमडी प्रमुख एम मोहापात्रा यांनी व्यक्त केली आहे.
नक्की वाचा - Rain Alert : ठाणे, पुण्यासह आज या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
तब्येतीची काळजी घ्या...
हिटवेवच्या काळात वाढलेलं तापमानामुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेता वृद्ध आणि लहान मुलांना आरोग्य समस्या उद्भवू शकतात. परिणामी उष्णतेमुळे होणारा थकवा आणि उष्माघात यांसारख्या उष्णतेशी संबंधित आजारांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे उष्णतेच्या लाटेदरम्यान घराबाहेर पडताना अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. याशिवाय या दिवशात शरीराला हायड्रेट ठेवणं आवश्यक आहे. यासाठी पुरेसं पाणी आणि सात्विक आहार फायदेशीर ठरू शकतो.