EXCLUSIVE: 'नोटबंदीने आमचं कंबरडं मोडलं', माजी नक्षल नेत्याची कबुली; कसा बसला फटका? वाचा मुलाखत

भूपतीने मान्य केले की नोटाबंदीचा मोठा परिणाम माओवादी संघटनेच्या दैनंदिन कामकाजावर झाला होता आणि गरजेच्या वस्तूंच्या खरेदीवरही याचा परिणाम झाला होता."

जाहिरात
Read Time: 3 mins

Surrender Naxal Leader Bhupathi:  कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा पोलित ब्युरो सदस्य आणि देशातील सर्वात धोकादायक माओवाद्यांपैकी एक असलेल्या भूपतीने महाराष्ट्रातील गडचिरोली येथील पोलीस कॅम्पमध्ये NDTV शी विशेष संवाद साधला. गेल्या वर्षी १५ ऑक्टोबर रोजी गडचिरोलीत त्याने आपल्या ६० साथीदारांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपली आधुनिक शस्त्रे ठेवून भारतीय संविधानाचा स्वीकार केला होता. या चर्चेवेळी बोलताना भुपतीने विविध विषयांवर भाष्य केले तसेच त्याने नोटबंदीमुळे नक्षलवादी चळवळीलाही फटका बसल्याची कबुली दिली. 

नोटबंदीने कंबरडं मोडलं, माजी नक्षल नेत्याची कबुली! 

आत्मसमर्पण केल्यापासून पोलीस कॅम्पमध्ये राहत असलेल्या भूपतीला 'धुरंधर' चित्रपटाची बरीच माहिती आहे. त्याने सांगितले की, "चित्रपटाचे भाग त्याने यूट्यूबवर पाहिले आहेत. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या नोटाबंदीच्या परिणामावर विचारले असता, भूपतीने मान्य केले की नोटाबंदीचा मोठा परिणाम माओवादी संघटनेच्या दैनंदिन कामकाजावर झाला होता आणि गरजेच्या वस्तूंच्या खरेदीवरही याचा परिणाम झाला होता."

Advertisement

Buldhana News: वर्दीचं स्वप्न अधुरं! भरतीच्या मैदानात धावता धावता श्वास थांबला; एकुलत्या एका मुलाचा मृत्यू

भूपतीने सांगितले की, "त्यांच्या संघटनेचे अंदाजे २५ ते ३० कोटींचे नुकसान झाले. "तसे पाहिले तर देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर हे काहीच नाही, पण आमच्यासाठी हा मोठा धक्का (सेटबॅक) होता. आम्ही अनेक लोकांना नोटा ठेवण्यासाठी आणि बदलण्यासाठी दिल्या, त्या सर्व कुठे गेल्या काहीच माहित नाही. तुम्हाला अंतर्वस्त्रे घालायची असतील तरी ती विकत घ्यावी लागतात. पैसा लागतो. पैसा हवा असतो. आमचा खर्च तर जनतेकडून चालायचा. आम्ही जनतेकडे जायचो. त्यांना सांगायचो की आमच्याकडे नोटा नाहीत, नोटाबंदीत सर्व संपले. मग त्यांच्याकडून मदत घ्यायचो. जनतेकडे जाऊन सामान आणायचो."

पोलिसांमुळे अडचणी वाढल्या.. 

"संपूर्ण भारतातील लोकांना विकासाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्या मिळाल्यानंतर नक्षलवादाची कोणतीही गरज नाही. आम्ही ज्या आंदोलनात होतो, त्यात अपयशी ठरलो, पुढे जाण्याचा मार्ग नव्हता. आता बरेच काही बदलले आहे. आम्ही जनतेपर्यंत पोहोचू शकत नव्हतो. म्हणूनच शस्त्रे सोडणेच योग्य आहे असे समजले. समस्या ही देखील आहे की पार्टी कार्यकर्त्यांचा अभाव निर्माण झाला. पोलिसांची नियुक्ती वाढली, पोलीस कॅम्पच्या संख्येत वाढ झाली, या परिस्थितीमुळे आम्हाला जनतेत जाण्यामध्ये अडथळे निर्माण झाले," अशी अडचणही भुपतीने बोलून दाखवली. 

दरम्यान, "जे आत्मसमर्पित कॅडर सदस्य आपला परिवार वाढवू इच्छितात अशा सदस्यांची 'रिव्हर्स व्हॅसेक्टॉमी' (नसबंदी उलटवण्याची शस्त्रक्रिया) करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस प्रशासनही यात पूर्ण मदत करत आहे. भूपतीने सांगितले की, “डॉक्टरांकडे माणूस पाठवला आहे. १५ लोकांचे ऑपरेशन केले आहे. आमच्यासोबत जे झाले ते झाले, पण आता हे लोक तरुण आहेत. सर्वांना आपला परिवार पुढे वाढवायचा आहे. त्यांचे भविष्य घडवायचे आहे.” शरण आल्यानंतर आपल्या वृद्ध भावाला भेटण्यासाठी गावी गेल्याचा अनुभवही त्याने NDTV टीमसोबत संवादादरम्यान सांगितला आणि गडचिरोलीतच पुढील आयुष्य घालवण्याची इच्छा व्यक्त केली.

आईच्या हत्येत पित्याला तुरुंगवास, निराधार भाचींचा 2 मामांनीच केला घात! सख्ख्या बहिणींसोबत भयंकर घडलं

'कॅडर सदस्यांना शरण येण्याचे आवाहन'

बेपत्ता माओवादी नेता गणपतीबद्दल विचारले असता भूपतीने कोणतीही माहिती नसल्याचे सांगत नकार दिला. तो म्हणाला की, "त्या विषयावर कोणालाच काही माहित नाही. आमचे नियम असतात की कोण कुठे जातो, त्या ठावठिकाण्याबद्दल (Whereabouts) फक्त जनरल सेक्रेटरीलाच सांगितले जाते. इतर कोणालाही काही सांगितले जात नाही. तसेच उर्वरीत कॅडर सहकाऱ्यांना त्याने शरण येण्याचे आवाहनही केले. परिस्थिती बदलली आहे. तुम्ही बाहेर या. बाहेर येऊनच तुम्ही जनतेमध्ये जा. संविधानांतर्गत काम करणेच हिताचे आहे, असे मी वारंवार सांगून विनंती करत आहे. आवाहन करत आहे, असं तो म्हणाला.