दु:खातून सावरली अन्...; वीराने दिली गुड न्यूज, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आनंदाचं वातावरण

वीरा वाघिणीने तीन गोंडस बछड्यांना जन्म दिला आहे. यापूर्वीच्या तीन प्रसुती मिळून वीरा आता १३ बछड्यांची आई झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी

Veera tigress gave birth to 3 cubs : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या आनंदाचं वातावरण आहे. पुन्हा एकदा येथे पाळणा हलला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेल्या 'वीरा' वाघिणीने सर्वांना गुड न्यूज दिली आहे. वीरा वाघिणीने तीन गोंडस बछड्यांना जन्म दिला आहे. यापूर्वीच्या तीन प्रसुती मिळून वीरा आता १३ बछड्यांची आई झाली आहे. पळसगाव जंगल परिसरात वीराने आपल्या तीन बछड्यांना जन्म दिला. ताडोबा परिसरातील वाघांच्या वाढत्या संख्येमुळे देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण या जंगलाकडे वाढत आहे. विशेषतः बफर क्षेत्रात वाघांचे सहज दर्शन घडत असल्याने पळसगाव, बेलारा आणि गोंडमोहाळी परिसर पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे समोर येत आहेत.

वीरा दु:खातून सावरली अन् पुन्हा झाली आई...

मूल गमावण्याचं दु:ख मोठं होतं. त्याच्या वेदना एखाद्या आईलाच कळू शकतात. वीरा वाघिणीनेही दोन वेळा आपल्या बछड्यांना गमावलं होतं. यामुळे ती खचली होती. तिचं वजनही कमी झालं होतं. मात्र ती त्यातून बाहेर आली. वन विभागानेही तिच्याकडे विशेष लक्ष दिलं आणि तिने गोड गोंडस अशा तीन बछड्यांना जन्म दिला. बेलारा गेट परिसरातील प्रसिद्ध नर वाघ ‘झायलो' हा वीराचा जोडीदार मानला जातो.

Advertisement

नक्की वाचा - Satara News : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कॅमेऱ्यात 'ब्लॅक पँथर', दुर्मीळ दृश्य; बिबट्या असूनही रंग काळा का?

अपत्यांची संख्या पोहोचली १३ पर्यंत...

वीरा वाघिण ही नावाप्रमाणेच वीर आहे. ही तिची चौथी प्रसुती. वीराने पहिल्यांदा बेलारा-गोंडमोहाळी जंगल परिसरात दोन बछडे, दुसऱ्या-तिसऱ्या प्रसुतीमध्ये चार आणि आता चौथ्या प्रसुतीत तीन बछड्यांना जन्म दिला. आता तिच्या एकूण अपत्यांची संख्या १३ पर्यंत पोहोचली आहे. तिच्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. सध्या ती सुरक्षित अधिवासात ती दिसून येत असल्याचं वनविभागाकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात गेला तर तुम्हालाही कदाचित वीरा तिच्या तीन बछड्यांसह दिसू शकते.