जाहिरात

Pune News: फक्त 10 रुपयात चहा अन् पाणी.. पुणे विमानतळावर प्रवाशांसाठी खास सोय!

Udaan Yatri Cafe Pune Airport: विमानतळावर बहुतांश ठिकाणी खाद्यपदार्थ महागडे मिळत असल्याने या कॅफेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘उडान यात्रा कॅफे’मुळे विमानतळावरील कर्मचाऱ्यांची तसेच प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

Pune News: फक्त 10 रुपयात चहा अन् पाणी.. पुणे विमानतळावर प्रवाशांसाठी खास सोय!

राहुल कुलकर्णी, पुणे:

 Udaan Yatri Cafe Pune Airport: पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे विमानतळावर आता 10 रुपयामध्ये चहा आणि पाणी मिळणार आहे. आज पुणे विमानतळावर उडाण यात्रा कॅफेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर ही सर्व प्रवाशांना आता ही सेवा पुरवण्यात येणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना खाद्यपदार्थांची अल्पोहाराची गरज भासते. मात्र विमानतळांवरील दुकानांमध्ये असणाऱ्या खाद्यपदार्थ्यांचे दर हे सामान्यांच्या खिशाला परवडणारे नसतात, त्यामुळे अनेकदा प्रवाशांची गैरसोय होते. यावर पर्याय म्हणून आता केंद्र सरकारने उडान यात्रा कॅफेची योजना आणली या कॅफेचे उद्घाटन पुणे विमानतळावरही करण्यात आले आहे.

त्यामुळे विमानतळावर आता माफक दरात खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत. या कॅफेमध्ये चहा आणि पाण्याची किंमत केवळ 10 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे दूरहून आलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. प्रवाशांना परवडणाऱ्या दरात चहा, कॉफी आणि अल्पोपहार मिळावा, या उद्देशाने ‘उडान यात्रा कॅफे'ची सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विमानतळावर बहुतांश ठिकाणी खाद्यपदार्थ महागडे मिळत असल्याने या कॅफेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘उडान यात्रा कॅफे'मुळे विमानतळावरील कर्मचाऱ्यांची तसेच प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

नक्की वाचा - Mumbai News: परफेक्ट नियोजन अन् करेक्ट कार्यक्रम... मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुसाट!

विमान प्रवास करत असताना अनेकदा  खिशाला परवडणाऱ्या खाद्यपदार्थांची गरज भासते. ‘उडान यात्रा कॅफे'मुळे ही गरज नक्कीच पूर्ण होणार आहे. यामुळे सामान्य प्रवाशांना कमी दरात चांगली आणि पौष्टिक खाद्यपदार्थ उपलब्ध असणार आहेत. सुरळीत आणि वेगवान सेवा हे या कॅफेचे वैशिष्ट्य असणार आहे, ज्यामुळे प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.

दरम्यान, पुणे विमानतळावर नवीन टर्मिनलचेही बांधकाम पूर्ण झाले असून, लवकरच ते प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या नवीन टर्मिनलमुळे विमानतळाची क्षमता वाढणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना अधिक चांगली सुविधा मिळू शकेल. नवीन टर्मिनलमध्ये 204 चारचाकी गाड्यांसाठी पार्किंग, 35+38 बससाठी थांबे तसेच 200 दुचाकी आणि 15 चारचाकी गाड्यांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

नक्की वाचा - Jalgaon Crime : तृप्ती 4 महिन्यांची गर्भवती, बापाने लग्नातच गोळ्या झाडल्या, ऑनर किलींगची भयंकर स्टोरी