अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर
शिक्षकानेच 11 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील एका नामांकित शाळेत ही घटना घडली आहे. यासंबंधीची तक्रार पीडीतेने कोरपना पोलिसात केली असून शिक्षकाविरोधात पोक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार शिक्षकाला आज पहाटे अकोल्यात अटक करण्यात आली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
मे महिन्यातील ही घटना असून, त्याची तक्रार काल (1 ऑक्टोबर) करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी एक्स्ट्रा क्लास करण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शाळेत जात होती. इतरही विद्यार्थी या वर्गाला यायचे. आरोपी शिक्षक अमीत लोडे हा वर्ग घ्यायचा.
(नक्की वाचा- जम्मू-काश्मीरमधील भाजप उमेदवाराचं निधन, 25 सप्टेंबरला झालं होतं मतदान)
एके दिवशी त्याने पीडित मुलीला कार्यालयात बोलावून तिला गुंगीच्या गोळ्या दिल्या आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलगी शुद्धीवर आल्यावर घडलेली गोष्ट घरी सांगू नये म्हणून त्याने मुलीला धमकी दिली. त्यामुळे ही मुलगी गप्प राहिली. पण तिने हा प्रकार वर्गातील मैत्रिणीला सांगितला होता.
(नक्की वाचा- मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला NDTV मराठीच्या हाती, कोणाच्या वाट्याला किती जागा?)
या मैत्रिणीने तिच्या आईला हा प्रकार आता सांगितल्यावर पीडितेच्या आईने काल पोलिसात तक्रार दिली. त्यावरून आरोपी शिक्षकाविरोधात पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनंतर हा शिक्षक फरार झाला होता. मात्र बुधवारी पहाटे त्याला अकोला येथे पकडण्यात आले. आरोपी शिक्षक हा कोरपना येथे युवक काँग्रेसचा पदाधिकारी आहे.