Ghatkopar versova Metro Issue: घाटकोपर- वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड! प्रवाशांची तुफान गर्दी, चेंगराचेंगरीसारखी स्थिती, VIDEO

Ghatkopar Versova Metro Line Technical Issue: बिघाडामुळे  गाड्या  उशिराने धावत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मेट्रोचा घोळ झाल्याने ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

Ghatkopar To Versova Metro Issue: लोकल ट्रेन आणि मेट्रो म्हणजे मुंबईकरांच्या रोजच्या धावपळीतील महत्त्वाचे सोबती. सकाळच्या वेळी लोकल, मेट्रो पकडण्यासाठी चाकरमान्यांची एकच धावपळ उडाल्याचे पाहायला मिळते. अशातच आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर धावणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे प्रवाशांचे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! सप्टेंबरपर्यंत पुणे मेट्रो लाईन 3 चा 13 किमीचा टप्पा सुरू होणार

याबाबत अधिक माहिती अशी की, घाटकोपर ते वर्सोवा (Ghatkopar- Versova Metro Technical Issue) मार्गावरील मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. अंधेरी स्थानकावर हा बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बिघाडामुळे  गाड्या  उशिराने धावत आहेत.  आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मेट्रोचा घोळ झाल्याने ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

महत्त्वाचं म्हणजे मेट्रोच्या तांत्रिक बिघाडामुळे घाटकोपर स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी (Massive Rush At Ghatkopar Metro Station) पाहायला मिळत आहे. सकाळी सर्वांनाच ऑफिस गाठण्याची घाई असतानाच मेट्रोचा खोळंबा झाला. त्यामुळे घाटकोपर स्थानकावर तुफान गर्दी झाली आहे. काही प्रवाशांनी याबाबतचे ट्वीटही केले असून इथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवू शकते, अशी चिंता व्यक्त केली आहे.