जाहिरात

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! सप्टेंबरपर्यंत पुणे मेट्रो लाईन 3 चा 13 किमीचा टप्पा सुरू होणार

मेट्रो लाईन 3 ही 23.3 किमी लांबीची असून त्यात 23 स्थानके असतील.

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! सप्टेंबरपर्यंत पुणे मेट्रो लाईन 3 चा 13 किमीचा टप्पा सुरू होणार
पुणे:

गेल्या सहा महिन्यांपासून, हिंजवडीतील वाहतूक कोंडी हा एक मोठा प्रश्न बनला आहे. या मुळे  नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. शिवाय या वाहतूक कोंडीवर कोणताही उपाय निघत नसल्यामुळे त्यावर टीका ही होत आहे. मोठ्या प्रमाणात होणारी टीका, लोकांची नाराजी यामुळे पीएमआरडीएने मेट्रोचं काम आणखी वेगाने करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय मेट्रोचा एक टप्पा सुरू करण्याची योजनाही तयार केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) या वर्षी सप्टेंबरपर्यंत 23 किमी लांबीच्या मेट्रो लाईन 3 चा 13 किलोमीटरचा टप्पा सुरू करण्याचा विचार करत आहे.  मेगापोलिस सर्कल ते बालेवाडी फाटा इथं पर्यंतची मेट्रो लाईन सुरू करण्याची योजना आखली जात आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत पीएमआरडीए आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्याद्वारे विकसित केला जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Marathi Hindi Row: मी युपीचा, महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तथाकथित...' 26/11 मधील कमांडोचा राज ठाकरेंना सवाल

मेट्रोचे काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पुणे मेट्रो दोन टप्प्यांत विकसित केली जात आहे. पहिल्या टप्प्यात, मान ते बालेवाडी फाटापर्यंतचा 14 किलोमीटरचा भाग या वर्षाच्या अखेरीस चाचणीसाठी आणि अंशतः कामकाजासाठी खुला केला जाईल.असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. एका वरिष्ठ पीएमआरडीए मेट्रो अधिकाऱ्याने सांगितले की “सरासरी, भारतात मेट्रोचे बांधकाम प्रति किलोमीटर 8 ते 14 महिने लागते. 23 किलोमीटरच्या टप्प्यासाठी, पूर्ण होण्याचा कालावधी चार वर्षांपेक्षा जास्त आहे. पीएमआरडीए त्या पेक्षा वेगात काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - Pune News: अरे पुण्यात चाललंय काय? आता 73 वर्षाच्या वृद्धाने केला 27 वर्षीय तरुणीचा विनयभंग

मेट्रो लाईन 3 ही  23.3 किमी लांबीची असून त्यात 23 स्थानके असतील. शुक्रवारी या मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली. पहीली या मार्गावरची  चाचणी डेपोपुरती मर्यादित होती. पण आता ती प्रत्यक्ष लाईनवरील झाली आहे. त्यामुळे आम्ही ही लाईन सुरू करण्याच्या अगजदी जवळ पोहोचलो आहोत असं पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांनी स्पष्ट केलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Navi Mumbai Crime: संतापजनक! कॉम्प्युटर क्लासेस चालकाकडून महिला सहकाऱ्याचा विनयभंग

संपूर्ण लाईन मार्च 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. असं  असली तरी, पीएमआरडीएचे उद्दिष्ट या वर्षाच्या अखेरीस मोठे बांधकाम पूर्ण करून पूर्ण झालेल्या टप्प्यांवर मेट्रो सुरू करण्याचं आहे.  आम्ही सप्टेंबरपर्यंत मान आणि बालेवाडी फाटा दरम्यान सेवा सुरू करू, असे म्हसे म्हणाले आहेत. 13 स्थानकांचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे. काही काम शिल्लक आहे त्यावर लक्ष केंद्रीत केलं जात असल्याचं ते म्हणाले. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com