
Ghatkopar To Versova Metro Issue: लोकल ट्रेन आणि मेट्रो म्हणजे मुंबईकरांच्या रोजच्या धावपळीतील महत्त्वाचे सोबती. सकाळच्या वेळी लोकल, मेट्रो पकडण्यासाठी चाकरमान्यांची एकच धावपळ उडाल्याचे पाहायला मिळते. अशातच आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर धावणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे प्रवाशांचे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! सप्टेंबरपर्यंत पुणे मेट्रो लाईन 3 चा 13 किमीचा टप्पा सुरू होणार
याबाबत अधिक माहिती अशी की, घाटकोपर ते वर्सोवा (Ghatkopar- Versova Metro Technical Issue) मार्गावरील मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. अंधेरी स्थानकावर हा बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बिघाडामुळे गाड्या उशिराने धावत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मेट्रोचा घोळ झाल्याने ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
Ghatkopar Metro Station - After 7 decades, Metro came to Mumbai but platforms and entry gates are too small to handle the Mumbai Peak hour crowd. Our Planners lack even a 5th std. Student level IQ? pic.twitter.com/xTkGwL2z4a
— Mihir Jha (@MihirkJha) July 7, 2025
महत्त्वाचं म्हणजे मेट्रोच्या तांत्रिक बिघाडामुळे घाटकोपर स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी (Massive Rush At Ghatkopar Metro Station) पाहायला मिळत आहे. सकाळी सर्वांनाच ऑफिस गाठण्याची घाई असतानाच मेट्रोचा खोळंबा झाला. त्यामुळे घाटकोपर स्थानकावर तुफान गर्दी झाली आहे. काही प्रवाशांनी याबाबतचे ट्वीटही केले असून इथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवू शकते, अशी चिंता व्यक्त केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world