Telangana News: लेकाचा BMWसाठी हट्ट, वडिलांनी दुसरी कार घेतली, रागाच्या भरात मुलाने आयुष्य संपवलं

Telangana Youth Death: कार खरेदी करण्यावरून अनेकदा भांडत असे आणि जर त्यांनी त्याला कार खरेदी केली नाही तर आत्महत्या करेल अशीही धमकी देत होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

तेलंगणा: वडिलांनी बीएमडब्ल्यू  कार गिफ्ट न दिल्याने तरुणाने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना तेलंगणामधील सिद्दीपेट येथे घडली आहे. मुलाने वडिलांकडे बीएमडब्ल्यू कार देण्याचा हट्ट धरला होता मात्र परिस्थिती नसल्याने वडिलांनी त्याला स्विफ्ट डिझायर घेऊन दिली. याच रागातून21 वर्षीय मुलाने आयुष्य संपवले. जॉनी असे या मुलाचे नाव असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, सिद्दीपेटच्या जगदेवपूर मंडळातील चटलापल्ली नावाच्या गावात ही घना घडली. गावातील बोम्मा कनकय्या यांचा 21 वर्षीय मुलगा जॉनी बीएमडब्ल्यू घेण्यासाठी हट्ट धरुन बसला होता.  तो त्याच्या वडिलांना बीएमडब्ल्यू कार खरेदी करण्याची मागणी करत होता. तो त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी बीएमडब्ल्यू कार खरेदी करण्यावरून अनेकदा भांडत असे आणि जर त्यांनी त्याला कार खरेदी केली नाही तर आत्महत्या करेल अशीही धमकी देत होता.

जॉनीच्या पालकांनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. जॉनीच्या पालकांनी त्याला सांगितले की त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आणि त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू कार खरेदी करण्याची क्षमता नाही. पण जॉनी बीएमडब्ल्यू कार खरेदी करण्यावर ठाम होता. खूप समजावल्यानंतरही  जेव्हा जॉनी ऐकत नव्हता आणि जीव देण्याची धमकी देऊ लागला, तेव्हा त्याच्या वडिलांनी कर्ज घेतले आणि त्याच्यासाठी मारुती स्विफ्ट डिझायर कार खरेदी केली.

नक्की वाचा-  Crime News : आंबे चोरीच्या संशयावरून शेतमजूराची बेदम मारहाण करत हत्या, 5 जणांना अटक)

पण जॉनीला फक्त बीएमडब्ल्यू हवी होती. म्हणून त्याने पुन्हा त्याच्या पसंतीची बीएमडब्ल्यू कार खरेदी करण्याची मागणी केली.यावर त्याच्या पालकांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला की त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू कार खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. यामुळे संतापलेल्या जॉनीने शुक्रवारीच त्याच्या शेतात विष प्राशन केले. कुटुंबातील सदस्यांनी त्याला पाहिल्यावर त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला चांगल्या उपचारांसाठी सिद्धिपेट (आरव्हीएम) इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरमध्ये नेण्यात आले. शनिवारी रात्री जॉनीची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Advertisement

Nashik News: संजय राऊतांचा एक फोन.. अखेर 'त्या' बड्या नेत्याची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी