
Maharashtra Politics Nashik News: राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाशिकचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बुडगुजर हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा होत्या, त्याआधीच पक्षाने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आपण पक्षामध्ये नाराज असल्याचेही म्हटले होते. त्यामुळे सुधाकर बडगुजर हे पक्षाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा होत्या.
त्याआधीच पक्षाकडून मोठी कारवाई करण्यात आली असून सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आज नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाची पत्रकार परिषद सुरु होती. ही पत्रकार परिषद सुरु असतानाच संजय राऊत यांनी नाशिक जिल्हाध्यक्षांना फोन केला. त्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
नक्की वाचा- Crime News : आंबे चोरीच्या संशयावरून शेतमजूराची बेदम मारहाण करत हत्या, 5 जणांना अटक)
दोन दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या होत्या. त्यासोबतच बडगुजर यांनी पक्षात नाराज असल्याचे जाहीरपणे बोलून दाखवले होते. पक्षातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना विचारात घेतले जात नसल्याचे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना पक्षाने थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
दरम्यान, सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे अखेर निश्चित झाले आहे. सोमवारी ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world