Tesla India launch : टेस्लाच्या भारतातील पहिल्या शोरुमचं आज मुंबईत उद्घाटन, CM फडणवीसांची उपस्थिती

जगातील नामांकित इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला (tesla india launch) आता भारतात पाऊल ठेवत आहे. आज टेस्लाचं भारतातील पहिलं शोरुम मुंबईत सुरू होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

जगातील नामांकित इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला (tesla india launch) आता भारतात पाऊल ठेवत आहे. आज टेस्लाचं भारतातील पहिलं शोरुम मुंबईत सुरू होत आहे. या कार्यक्रमात कंपनी आपल्या कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर इलेक्ट्रिक SUV मॉडेल Y देखील लॉन्च करणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही कार एकावेळी फुल चार्ज केल्यानंतर 575 किलोमीटरपर्यंत धावू शकेल. 
  
दरम्यान मुंबईतील टेस्लाचं शोरुम एक्सपिरियन्स सेंटर (Tesla's Showroom Experience Center) असेल. इथे लोक टेस्लाच्या गाड्या पाहू शकतात, टेस्ट ड्राइव्ह करू शकतात. भारतात वेगानं वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजाराच्या पार्श्वभूमीवर टेस्लाचा प्रवेश महत्त्वाचा असेल.  वांद्रा-कुर्ला संकुलात आज सकाळी 9.30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकही यावेळी उपस्थित असतील. लवकरच हे शोरूम सर्वसामान्यांसाठी खुलं केलं जाणार आहे. अद्याप अधिकृतपणे याची घोषणा केलेली नाही.

नक्की वाचा - Microsoft Layoffs: मायक्रोसॉफ्ट कंपनी 9,000 कर्मचाऱ्यांना करणार कमी, महिनाभरातील दुसरी मोठी कपात

50 लाखांपर्यंत SUV मॉडेल Y...

गेल्या काही महिन्यांत, टेस्लाने भारतात 10 लाख डॉलरहून जास्त किमतीची इलेक्ट्रिक वाहने, चार्जर आणि अॅक्सेसरीज आयात केल्या आहेत. कंपनीने हे अमेरिका आणि चीनमधून आयात केले आहे. या रिपोर्टच्या कागदपत्रांनुसार, यात कंपनीची बेस्ट सेलिंग मॉडेल Y च्या सहा युनिटचा समावेश आहे. या कॉम्पॅक इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर एसयुव्हीची किंमत 27 लाखांहून (आयात कराव्यतिरिक्त) अधिक असेल मात्र यावर तब्बल 21 लाखांचा आयात कर आणि टॅक्सनंतर ग्राहकांना हा मॉडेल 50 लाखांच्या जवळपासपर्यंत मिळू शकेल. 

Advertisement