Thane News: साखरझोपेत असतानाच अनर्थ घडला, स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना, ठाण्यातील धक्कादायक घटना

आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी इमारतीला पूर्णपणे सीलबंद करण्यात आले आहे व पुढील कारवाई ठामपा बांधकाम विभाग यांच्याकडून करण्यात येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रिझवान शेख, ठाणे: 

Thane Building Slab Collapse:  ठाण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात एका इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने धाव घेत संपूर्ण इमारत रिकामी केली आहे.

इमारतीचा स्लॅब कोसळला, 3 जण जखमी 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ठाण्यामधील शांतीनगर वागळे इस्टेट परिसरातील नूतन नीलम अपार्टमेंटच्या पाच मजली इमारतीमध्ये स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली. इमारतीचा 501 रूम नंबरचा स्लॅब 402 रूम नंबरच्या फ्लॅटमध्ये कोसळला. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. गजेंद्रप्रसाद प्रिन्स यादव आणि प्रदीप यादव अशी जखमींची नावे आहेत.

Sunetra Pawar: दादांप्रमाणे वहिनींचा रुद्रावतार, NCP बैठकीत 'त्या' आमदाराला झाप झापलं

 सदर व्यक्तींना उपचारासाठी गंगुबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी प्रदीप यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचाराकरता फोर्टिस हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. इमारतीमध्ये एकूण 26 रूम असून त्यामध्ये एकूण अंदाजे 90 ते 95 व्यक्ती राहतात. घटनेच्या वेळी तिन्ही कामगार साखर झोपेत होते. पहाटेच्या वेळी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.

इमारत तात्काळ रिकामी

 दुर्घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तसेच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सदरची इमारत c2b या प्रवर्गामध्ये येत असल्याने इमारत धोकादायक स्थितीत असल्या कारणाने सुरक्षेच्या कारणास्तव सदर इमारत पूर्ण रिकामी करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी इमारतीला पूर्णपणे सीलबंद करण्यात आले आहे व पुढील कारवाई ठामपा बांधकाम विभाग यांच्याकडून करण्यात येणार आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक संघर्ष शिगेला! शिवसेनेकडून मोठी घोषणा, थेट अभियान सुरु...