ठाणे-घोडबंदर मार्गावरुन गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मार्गात मोठा बदल करण्यात आला आहे. या मार्गावर (Thane-Ghodbunder Road) पुढील पाच दिवस वाहतूक बंदी ठेवण्यात येणार आहे. 5 जुलै ते 9 जुलै या कालावधीत या मार्गावरुन वाहतूक करता येणार नाही. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन ठाणे वाहतूक विभागाकडून करण्यात आला आहे. रस्त्यांवरील खड्डे आणि पावसाची संततधार यामुळे आधीच प्रवाशांना वाहतूक कोंडीच्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. त्यात ठाणे-घोडबंदर रस्ता बंद केल्यानंतर नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागणार आहे.
सध्या मुंबईतील अनेक भागात मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू आहे. ठाण्यातील वडाळा-घाटकोपर-कासारवडवली येथेही मेट्रोचं काम सुरू आहे. यात कापूरबावडी सर्कल समोरील नाला पुलावर मेट्रोच्या खांबांवर तुळई म्हणजेच गर्डर बसवण्याचं काम सुरू आहे. यासाठी 500 टन क्षमतेच्या दोन भल्यामोठ्या क्रेनचा वापर करण्यात येणार आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पुढील पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
नक्की वाचा - Mumbai News : रिक्षा आणि टॅक्सी तक्रारीसाठी परिवहन विभागानं सुरु केला टोल फ्री क्रमांक, हा नंबर करा सेव्ह!
पर्यायी मार्ग कोणते?
रवि स्टील नाक्याकडून डाव्या बाजूला वळून पोखरण रोड क्रमांक दोन मार्गे
कॅपिटॉल हॉटेल समोरील रस्त्याने कापूरबावडी सर्कलमार्ग घोडबंदर, कोलशेत आणि भिवंडीकडे जाणाऱ्या वाहनांना गोल्डन क्रॉस येथे प्रवेश बंदी
कॅपिटॉल हॉटेल समोरील उतरणीमार्गे कापूरबावडी सर्कल येथून कोलशेत अथवा बाळकुम, भिवंडीकडे जाणाऱ्या वाहनांना ज्युपिटर रुग्णालयासमोरील मुख्य आणि सेवा रस्त्याला जोडणाऱ्या भागातून प्रवेश बंदी