Thane Water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, 2 दिवस पाणी कपात

सध्या राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असताना ठाणे महानगरपालिकेने मात्र पाणी कपातीची घोषणा केली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Thane News : सध्या राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असताना ठाणे महानगरपालिकेने मात्र 21 आणि 22 ऑगस्ट रोजी पाणीकपातीची घोषणा केली आहे. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात येत आहे. गुरुवारी 21 ऑगस्ट दुपारपासून शुक्रवारी 22 ऑगस्टच्या दुपारपर्यंत ठाण्यातील अनेक भागात 24 तासांसाठी पाणीकपात असणार आहे. 

या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत मुंब्रा (झोन 26 आणि 31) येथील काही भागांसह, कल्ला पाणीपुरवठा समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व भागात, रुपदेई पाडा, गक्षिणीर क्रमांक 2, नेहरुनगर, मानपाडा प्रसादगमित, कोलशेत खालचा वड या भागातील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. 

नक्की वाचा - Jayakwadi Dam : मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटला! जायकवाडी धरण 96 टक्क्यांवर; धरणाचे 18 दरवाजे दुसऱ्यांदा उघडले

पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल अशीही सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे पाणीकपातीच्या काळात नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. 

Advertisement


 

Topics mentioned in this article