Thane Municipal Corporation Bharti: ठाणे महानगरपालिकेने आपल्या अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. महापालिकेच्या आस्थापनेवर गट 'क' आणि 'ड' संवर्गातील फायरमन (अग्निशमन जवान) पदांसाठी तब्बल ३८१ जागांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीमुळे शहरातील तरुण-तरुणींना शासकीय सेवेत रुजू होण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी
या भरती प्रक्रियेत होमगार्ड्ससाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. ज्या होमगार्ड्सनी किमान ३ वर्षे सेवा पूर्ण केली आहे आणि जे फायरमन पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक व शारीरिक पात्रता धारण करतात, अशा उमेदवारांसाठी एकूण ३८१ पदांपैकी ५ टक्के म्हणजे १९ पदे समांतर आरक्षणांतर्गत राखीव ठेवण्यात आली आहेत.
या पात्र होमगार्ड उमेदवारांसाठी अर्ज करण्याची मुदत १७ जुलै २०२६ ते २३ जुलै २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, ज्या उमेदवारांनी ऑगस्ट २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार अर्ज केले होते, परंतु त्यावेळी त्यांना होमगार्ड आरक्षणानुसार अर्ज करता आलेला नव्हता, अशा उमेदवारांसाठी महापालिकेने दिलासा दिला आहे. अशा उमेदवारांना त्यांच्या अर्जात दुरुस्ती (Edit) करण्यासाठी २४ जुलै २०२६ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत विशेष लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी Thane Municipal Corporation Bharti 2026 notification pdf या लिंकवर क्लिक करा..
कसा आणि कुठे कराल कर्ज?
इच्छुक उमेदवारांनी www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ३० जुलै २०२६ च्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत. तांत्रिक अडचणींसाठी ०२२-६१०८७५२० आणि जाहिरातीशी संबंधित माहितीसाठी ०२२-२५४१५४९९ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Shivsena News: ठाकरेंच्या बंडखोर खासदार गटाचे शिवसेनेत विलिनीकरण, लोकसभा अध्यक्षांनी दिली मान्यता
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world