जाहिरात

Thane Traffic Police: हेल्मेट नाही म्हणून दंड.. त्याच तरुणाने क्षणात पोलिसांची चूक पकडली, थेट कारवाई झाली

Thane Traffic Cop Fined After Video: पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जवळपास दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Thane Traffic Police: हेल्मेट नाही म्हणून दंड.. त्याच तरुणाने क्षणात पोलिसांची चूक पकडली, थेट कारवाई झाली

रिझवान शेख, प्रतिनिधी:

Thane Traffic Police Viral Video: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका तरुणाला दंड आकारणी केल्यानंतर, त्याच तरुणाने वाहतूक पोलिसांच्या दुचाकीवर असलेला 'अस्पष्ट' नंबर आणि नियमांचे उल्लंघन पकडले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, स्वतः वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी संबंधित गाडीवर कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जवळपास दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, 24 तारखेला दुपारी ठाण्यातील अंबिका नगर परिसरामध्ये  वाहतूक हवालदार गायकवाड आणि हवालदार शेलार हे बीट मार्शल ड्युटीवर कार्यरत होते. ड्युटीवर असताना हवालदार गायकवाड यांनी एका मित्राची गाडी वापरण्यासाठी घेतली होती, जी पोलिसांच्या ड्युटीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनासारखी नव्हती. ड्युटीवर असताना त्यांनी एका तरुणाला 'विदाऊट हेल्मेट' असल्याने दंड (चार्ज) ठोठावला आणि तेथून ते निघाले.

CIDCO News: निवडणुकीआधी मोठं गिफ्ट! सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार? वाचा मोठी अपडेट

ज्या तरुणावर दंड आकारला, त्याने मनात द्वेष ठेवून, त्याच परिसरात फिरणाऱ्या पोलिसांच्या दुचाकीचे शूटिंग केले. तरुणाने पोलिसांना जाब विचारला की, 'तुमच्या गाडीची नंबर प्लेट कुठे आहे?' या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला. विशेष म्हणजे वाहतूक पोलीस वापरत असलेल्या दुचाकीच्या मागील बाजूला नंबर प्लेट होती, परंतु पुढची नंबर प्लेट 'इन प्रॉपर' (अस्पष्ट/गंजलेली) होती, तसेच गाडीवर आरसे (मिरर) नव्हते तरुणाने विचारले असता, वाहतूक पोलिसांनी ती गाडी 'कारवाईसाठी जात आहे' असे खोटे सांगितले, पण ती गाडी प्रत्यक्षात मित्राची असल्याचे नंतर उघड झाले.

सोशल मीडियावर हे व्हायरल झाल्यानंतर वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. दुसऱ्या दिवशी त्या गाडीवर 'इन प्रॉपर नंबर प्लेट', 'विदाऊट मिरर' आणि 'पोलीस पाटील' (पोलीस लोगो/चिन्हाचा) अनधिकृत वापर केल्याबद्दल जवळपास ₹२००० चा ई-चलन (E-Challan) दंड आकारण्यात आला आहे. तर उपायुक्त शिरसाट यांनी तरुणाला इशारा दिला की, अशा प्रकारे धावत जाऊन पोलिसांची गाडी पकडण्याचा प्रयत्न करू नये. यात तरुण स्वतः जखमी होऊ शकतो किंवा हवालदाराला इजा होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

पोलीस कधीही 'द्वेष बुद्धीने' कारवाई करत नाहीत. म्हणूनच, व्हिडिओ बनवून पोलिसांना अडवणाऱ्या तरुणावर अद्याप कोणत्याही कलमाखाली कारवाई करण्यात आलेली नाही. वाहतूक चलन (ट्रॅफिक ॲप) विषयी काही तक्रार असल्यास, नागरिकांनी थेट ट्रॅफिक ॲपवर तक्रार करावी, स्वतःचा आणि पोलिसांचा जीव धोक्यात घालू नये.

Rapido driver : 3 मिनिटं उशीर झाला म्हणून रॅपिडो चालकाकडून थेट धमकी Video Viral

या घटनेमुळे, दुचाकीवर सरसपणे पोलिसांचा लोगो किंवा 'पोलीस' स्टीकर मारून फिरणाऱ्यांवर वाहतूक पोलीस आता कधी कारवाई करणार, असा प्रश्न सामान्य वाहनचालक विचारत आहेत.तुम्ही तुमच्या चलनविषयी तक्रार ट्रॅफिक ॲपवर करू शकता. वाहतूक नियमांचे उल्लंघन न करता, थेट आणि सुरक्षित मार्गाने तक्रार करण्याचे आवाहन ठाणे वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com