Parinay Fuke Nagpur : 'लग्नात फसवणूक, पतीच्या संपत्तीपासून दूर ठेवलं, मुलांच्या कस्टडीतही...' प्रिया फुकेंचे धक्कादायक आरोप

Parinay Fuke Nagpur : प्रिया फुके यांनी परिणय फुकेंवर अनेक धक्कादायक आरोप केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील याकडे लक्ष देत नसल्याचं त्या आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

जाहिरात
Read Time: 2 mins

भाजपचे आमदार परिणय फुके यांच्याकरून मला धमकी दिली जात आहे. माझ्या मुलाच्या कस्टडीसाठी प्रयत्न केला जात आहे. दु्र्देवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या प्रकरणात लक्ष देत नसल्याचा आरोप परिणय फुके यांची भावजय प्रिया फुके यांनी केला आहे. आज नागपुरात पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली कैफियत मांडली. यावेळी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे आणि सुषमा अंधारेही उपस्थित होत्या. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लग्नातही फसवणूक...
2012 मध्ये प्रिया फुके यांचं परिणय फुके यांचे बंधू संकेत फुके यांच्याशी लग्न झालं होतं. त्यानंतर 2022 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. संकेत फुके यांचं लग्नापूर्वी किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं. मात्र लग्नावेळी प्रिया फुके यांना अंधारात ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे. दहा वर्षांनंतर किडनी संसर्गातून संकेत फुके यांचा मृत्यू झाला. 

Advertisement

नक्की वाचा - Maharashtra Politics: मोठी बातमी! राज ठाकरेंनी अमित शाहंची भेट नाकारली? मनसे नेत्याचा दावा

मुलांच्या कस्टडीसाठी दबाव...
प्रिया फुके यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, परिणय फुके यांच्याकडून मला धमकी दिली जात आहे. पतीच्या मृत्यूनंतर मी घरात पतीचा पैशांचा कारभार आणि मालमत्तेविषयी प्रश्न विचारले. मात्र मला तू कोण आहे असा प्रश्न विचारण्यात आला. इतकच नाही तर रात्री मला घराबाहेर काढण्यात आलं.दीड वर्षांपासून आईच्या घरी राहते. आजही अज्ञात व्यक्ती माझा पाठलाग करीत असतात. मला जीवे मारण्याची धमकी दिली जाते. मला 10 वर्षांचा मुलगा आणि 8 वर्षांची मुलगी आहे. आता संकेतच्या आई-वडिलांकडून मुलांच्या कस्टडीसाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे. 

हक्कासाठी मला दररोज पोलिसांच्या चकरा माराव्या लागत आहे. मला मारण्यासाठी गुंड पाठवले जातात. माझ्यावर अॅट्रोसिटी, खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मला विनाकारण त्रास दिला जात असल्याचंही प्रिया फुके यांनी यावेळी सांगितलं.