योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akona Municipal Corporators Suspension News : अकोला महापालिकेतून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.अवैध जात प्रमाणपत्र प्रकरणात महापालिकेतील तीन नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.या निर्णयामुळे महापालिकेच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विविध पक्षांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.संबंधित नगरसेवक आरक्षित जागांवरून निवडून आले होते.त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रांबाबत सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणामुळे महापालिकेच्या सभागृहातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तीन नगरसेवकांची सदस्यत्वता धोक्यात,आयुक्तांचा आदेश
निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये प्रभाग क्रमांक 16-ब मधील शरद पवार गटाच्या अमरीन सदफ सय्यद नाझीम, प्रभाग क्रमांक 2-अ मधील एआयएमआयएमच्या सीमा अंजुम शेख अनीस आणि प्रभाग क्रमांक 1-अ मधील काँग्रेसचे शेख अब्दुल्ला शेख सलीम यांचा समावेश आहे.संबंधित तिन्ही नगरसेवकांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांच्या सदस्यत्वावर कारवाई करण्यात आली आहे.
नक्की वाचा >> Pune News: लोणावळ्यात जाणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा, लोहगडसह 'या' पर्यटनस्थळांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार,अकोला महापालिका आयुक्त डॉ.सुनील लहाने यांनी संबंधित आदेश जारी केला आहे.सक्षम प्राधिकरणाने जात वैधता प्रमाणपत्र अवैध घोषित केल्यानंतर कायदेशीर तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात या निर्णयाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
उच्च न्यायालयात आव्हान,पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
दरम्यान, निलंबित तिन्ही नगरसेवकांनी या कारवाईला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,ते लवकरच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या आदेशाविरोधात दाद मागणार आहेत. न्यायालयाकडून दिलासा मिळावा,अशी त्यांची भूमिका असल्याचे समजते.
नक्की वाचा >> Satara News: साताऱ्यातील 'या' प्रसिद्ध शाळेत विद्यार्थ्यांची पळापळ, काही जण गुदमरले, शिक्षकांनाही झाली बाधा
त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी आणि न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.न्यायालयाकडून काय निर्णय दिला जातो,यावर या तिन्ही नगरसेवकांचे राजकीय भवितव्य आणि संबंधित प्रभागांतील पुढील परिस्थिती अवलंबून राहणार आहे.त्यामुळे अकोला महापालिकेतील या घडामोडीकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचेही लक्ष लागले असून,पुढील कायदेशीर प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.