मुंबई-गोवा महामार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, 'हा' आहे पर्यायी मार्ग

मुंबई गोवा महामार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. दोन टप्प्यात हा ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत असेल.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबई गोवा महामार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. दोन टप्प्यात हा ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत असेल. तर दुपारी 2 ते  4 वाजेपर्यंत पुन्हा हा ब्लॉक असेल. या कालावधीत मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या आणि गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या वाहानांसाठी पर्यायी मार्ग सुचवण्यात आला आहे. 11 जुलै ते 13 जुलै दरम्यान हा ब्लॉक घेण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महामार्गावर ब्लॉक का? 

मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड जवळी पुई येथील म्हैसदरा इथे पुल उभारण्यात येत आहे. या पुलाचे गर्डर बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी हा ब्लॉक घेणे गरजेचे होते. त्यानुसार हा ब्लॉक 11 आणि 13 जुलैला घेण्यात येणार आहे. दोन टप्प्यात हा ब्लॉक घेतला जाईल. या कालावधीत या मार्गवरील वाहतूक बंद करण्यात येईल. वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग सुचवण्यात आला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - विधानपरिषदेला 12 वा उमेदवार देण्याची गरज नव्हती, विश्वजीत कदमांची रोखठोक भूमिका

पर्यायी मार्गाचा करा वापर 

या कालावधीत मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग सुचवण्यात आला आहे. त्यानुसार वाकण फाटा येथून भिसे खिंड-रोहा- कालाड मार्गे पुन्हा मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल. तर वाकण फाटा येथून पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपूर-माणगाव वरून मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करता  येईल. या शिवाय खोपोली-पाली-वाकण राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपूर-माणगाव वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.

ट्रेंडिंग बातमी - हॉटेल पॉलिटिक्सचा जोर; भाजप, शिंदे आणि ठाकरेंच्या आमदारांचा मुंबईतील कोणत्या 5 स्टारमध्ये मुक्काम?

गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या वाहनांसाठी  

ब्लॉकच्या कालावधीत गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग ही देण्यात आला आहे. त्यानुसार कोलाड येथून कालाड-रोहा-भिसे खिंड-वाकण फाटा किंवा नागोठणे वरून वळवून  मुंबई गोवा महामार्गावर येता येईल. तर कोलाड येथून रवाळजे-पाली वरून वळवून वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरून मार्गस्थ करता येईल. कोलाड येथून रवाळजे-पाली-वाकण फाटा वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल. हे पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. सर्व प्रवाशांनी या कालावधीत पर्यायी मार्ग वापरुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

Advertisement